ETV Bharat / state

पालघरमध्ये 27 व्या आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे आयोजन

आदिवासी एकता परिषदेचे 27 वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन 13 ते 15 जानेवारी दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे.

आदिवासी एकता परिषद
आदिवासी एकता परिषद
author img

By

Published : Jan 11, 2020, 2:40 PM IST

पालघर - आदिवासी एकता परिषदेचे 27 वे आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन 13 ते 15 जानेवारी दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच जनसमूहाच्या अस्तित्वासाठी न्याय हक्कासाठी व विविध विषयांवर चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे या महा संमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपरिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन आयोजित करण्यात येणार असून 'आदिवासीत्व' या केंद्रबिंदू मधून या सांस्कृतिक वा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

माहिती देताना अशोक चौधरी

या संमेलनात देशातील विविध भागातून एक लाखांहून अधिक आदिवासी बांधव सहभागी होण्याची शक्यता असून या संमेलनाची तयारी सुरू आहे. आदिवासी हे खरे मूळ निवासी असल्याचे सर्वोच्च न्यायालय मान्य करत असताना देशातील आदिवासींच्या अस्तित्वावर सतत हल्ले होत आहेत. आदिवासींच्या जल, जंगल, जमिनीवरील अधिकार नाकारले जात आहेत. 5 व्या तसेच 6 व्या अनुसूची अंतर्गत त्याचप्रमाणे पेसा कायद्याने दिलेले ग्रामसभेचे अधिकार अशा संविधानात्मक तरतुदींचे सर्रास उल्लंघन होत आहे. आदिवासी जनसमूहाच्या निसर्गपूजक परंपरा नाकारून त्यांच्यावर सांस्कृतिक आक्रमण तीव्र केले जात आहे. आदिवासीवर इतर धर्म, अंधश्रद्धा लादले जात असल्याने आदिवासी अस्तित्व पणाला लागले आहे.

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला तरी विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या विनाश नीतीच्या केंद्रस्थानी असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई-वडोदरा एक्स्प्रेसवे एमएमआरडीए विकास आराखडा, सागरी महामार्ग आदी प्रकल्पांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी हद्दपार करण्याचे प्रयत्न होत आहेत. संपूर्ण देशात अशा अविनाश मी तिच्या विरोधात आदिवासी एकता परिषद संघर्ष करीत असून पालघर जिल्ह्यातही भूमिसेना, आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम धोदडे यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे.

जागतिक तापमान वाढीचे संकट हे जीवसृष्टी संकटात टाकणारे असून याचे दुष्परिणाम आपल्याला अनुभवायला येत आहेत. मात्र, आदिवासी जंगले राखत, पर्यावरणाचा समतोल आजवर राखला आहे. आदिवासी ज्या समुहांच्या सामाजिक सांस्कृतिक जाणीवा या सर्वसमावेशक, लोकशाहीवादी आणि निसर्गाशी एकरूप होण्यास प्रवृत्त करणाऱ्या आहेत. आदिवासींचे हे जीवन दर्शन तसेच कला, भाषा, संस्कृती यांची अभिव्यक्ती आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

महाराष्ट्रात होणारे हे 7 वे महासंमेलन असून संमेलन या संमेलनात राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, सिलवास-दादरा नगरहवेली या राज्यासह देशातील 22 राज्यांमधील प्रतिनिधी व आदिवासी बांधव या महासंमेनलात सहभागी होणार आहेत.

हेही वाचा - पालघरमधील 11,831 शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Intro:      13 ते 15 जानेवारी  पालघर येथे आदिवासी एकता परिषदेच्या 27 व्या 'आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे' आयोजन; देशभरातील आदिवासी बांधव एकवटणारBody:      13 ते 15 जानेवारी  पालघर येथे आदिवासी एकता परिषदेच्या 27 व्या 'आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाचे' आयोजन; देशभरातील आदिवासी बांधव एकवटणार

नमित पाटील,
पालघर, दि.11/1/2020

    आदिवासी एकता परिषदेचे 27 वे 'आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलन' 13 ते 15 जानेवारी दरम्यान पालघर येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात निसर्ग पूजक परंपरा, भाषा, कला संस्कृती या संवर्धनासाठी तसेच जनसमूहाच्या अस्तित्वासाठी न्याय हक्कासाठी जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती आदींसह समाजाला भेडसावणाऱ्या विविध मुद्द्यांवर विस्तृत चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे या महा संमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपारिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजित करण्यात येणार असून 'आदिवासीत्व' या केंद्रबिंदू मधून म्हणून या सांस्कृतिक वा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात देशातील विविध भागातून एक लाखाहून अधिक आदिवासी बांधव सहभागी होण्याची शक्यता असून या संमेलनाची तयारी सुरू आहे.

     आदिवासी हे खरे मूळनिवासी असल्याचे सर्वोच्च न्यायालय मान्य करत असताना देशातील आदिवासींच्या  अस्तित्व वर सतत हल्ले होत आहेत. आदिवासींच्या जल, जंगल, जमीनीवरील अधिकार नाकारले जात आहेत. 5 व्या तसेच 6 व्या अनुसूची अंतर्गत त्याचप्रमाणे पेसा कायद्याने दिलेले ग्रामसभेचे अधिकार अशा संविधानात्मक तरतुदींचे सर्रास उल्लंघन होत आहे. आदिवासी जनसमूहाच्या निसर्गपूजक परंपरा नाकारून त्यांच्यावर सांस्कृतिक आक्रमण तीव्र केले जात आहे. आदिवासीवर इतर धर्म, अंधश्रद्धा लादल्या जात असल्याने आदिवासी अस्तित्व पणाला लागले आहे. 

      पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असला तरी विकासाच्या नावाखाली चालू असलेल्या विनाश नीतीच्या केंद्रस्थानी असून दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई वडोदरा एक्स्प्रेसवे एमएमआरडीए विकास आराखडा, सागरी महामार्ग आदी प्रकल्पांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यातील आदिवासी हद्दपार करण्याचे प्रयत्न होत आहेत.  संपूर्ण देशात अशा अविनाश मी तिच्या विरोधात आदिवासी एकता परिषद संघर्ष करीत असून पालघर जिल्ह्यातही भूमिसेना, आदिवासी एकता परिषदचे संस्थापक काळूराम धोदडे यांच्या नेतृत्वात संघर्ष सुरू आहे.

      जागतिक तापमान वाढीचे संकट हे जीवसृष्टी संकटात टाकणारे असून याचे दुष्परिणाम आपल्याला अनुभवायला येत आहेत मात्र आदिवासी जंगले राखली, पर्यावरणाचा समतोल आजवर राखला आहे. आदिवासी ज्यांना समूहांच्या सामाजिक सांस्कृतिक जाणीवा या सर्वसमावेशक, लोकशाहीवादी आणि निसर्गाशी एकरूप होण्यास प्रवृत्त करणाऱ्या आहेत. आदिवासींचे हे जीवन दर्शन तसेच कला, भाषा, संस्कृती यांची अभिव्यक्ती आदिवासी एकता सांस्कृतिक महासंमेलनाच्या माध्यमातून केली जाणार आहे.

       महाराष्ट्रात होणारे हे 7 वे महासंमेलन असून संमेलन या संमेलनात राज्यातील विविध जिल्ह्यांसह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, सिलवास-दादरा नगरहवेली सह देशातील 22 राज्यांमधील प्रतिनिधी व आदिवासी बांधव या महासंमेनलात सहभागी होणार आहेत. या तीन दिवसीय महासंमेलनात आदिवासी संस्कृती व इतर संघटित धर्माचा प्रभाव, आदिवासी महिलांचे प्रश्न उपाय, आदिवासी स्वावलंबन व अर्थव्यवस्था व प्रकृती संतुलन, तथाकथित मुख्यधारेची विकास दृष्टी व पर्याय, आदिवासी स्वशासन, संविधानिक अधिकार व मानव अधिकार, आदिवासी एकता परिषदेचे घोषणापत्र व शोषण मुक्ती आंदोलन, आदिवासी शिक्षण व आरोग्य तसेच पर्यावरण संकट आदिवासी जीवनशैलीतील समाधान इत्यादी विषयांवर चर्चा होणार आहे. संमेलनानिमित्त 14 जानेवारी रोजी पालघर येथे सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये तारपा, ढोल नाच तसेच देशभरातील आदिवासी जन समूहाची कला, संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीत माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. 

Exclusive Byte-
अशोक भाई चौधरी- महासचिव, आदिवासी एकता परिषद

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.