हैदराबाद : OnePlus 13 लाँच होण्याआधी, प्रीमियम स्मार्टफोन कंपनी OnePlus च्या नवीन फ्लॅगशिप फोन, OnePlus 12 वर विशेष सवलतीचा लाभ मिळत आहे. या फोनच्या किमतीत यापूर्वी कपात करण्यात आली होती. आता कंपनी यावर मोठ्या इन्स्टंट डिस्काउंटचा लाभही देत आहे. विशेष ऑफरमुळं, या विशेष ऑफरमूळ बेस व्हेरीयंटवर 10 हजारांची सूट मिळतेय. OnePlus 12 डिझाइन, कॅमेरा आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत मजबूत आहे.
3x ऑप्टिकल झूम सपोर्ट : OnePlus 12 मध्ये बॅक पॅनलवर Hasselblad द्वारे ट्यून केलेली कॅमेरा प्रणाली आहे. यात 3x ऑप्टिकल झूम सपोर्ट उपलब्ध आहे. याशिवाय हा फोन पोर्ट्रेट फोटोग्राफीच्या बाबतीतही अनेक खास फीचर्स यात आहेत. OnePlus चा सध्याचा फ्लॅगशिप फोन Aqua-Touch फीचरला सपोर्ट करतो. त्यामुळं हात ओले असले किंवा स्क्रीनवर पाण्याचे काही थेंब असले तरीही डिव्हाइस सहज वापरता येतो.
OnePlus 12 स्वस्त : ऑफर्समुळं OnePlus 12 स्वस्त झालाय. कंपनीनं ऑगस्टमध्ये OnePlus 12 च्या किमतीत कपात केली होती, त्यानंतर त्याची सुरुवातीची किंमत 64 हजार 999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. हा 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट Amazon वर 61 हजार 999 रुपयांना लिस्ट झाला आहे. जर ग्राहकांनी OneCard क्रेडिट कार्ड, RBL बँक क्रेडिट कार्ड, फेडरल बँक क्रेडिट कार्ड किंवा फेडरल बँक डेबिट कार्डच्या मदतीनं हा फोन खरेदी केला तर, त्यांना 7000 रुपयांची सवलत मिळू शकते.
24 हजारापर्यंत एक्सचेंज डिस्काउंट : जुन्या फोनच्या बदल्यात ग्राहकांना कमाल 24 हजार 150 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो. फोनची किंमत जुन्या फोनच्या मॉडेल स्थितीवर अवलंबून असेल. हा फोन सिल्की ब्लॅक, ग्लेशियल व्हाइट आणि फ्लोई एमराल्ड या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येईल.
वनप्लस 12 ची वैशिष्ट्ये : OnePlus स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा 2K OLED ProXDR डिस्प्ले आहे. हा फोन 120Hz रिफ्रेश रेटसह 4500nits ची पीक ब्राइटनेस देतो. यात 16GB पर्यंत LPDDR5x रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज आहे. मजबूत कामगिरीसाठी यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 जनरल 3 प्रोसेसर आहे.
50MP OIS मुख्य कॅमेरा : कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झाल्यास, बॅक पॅनलवरील ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 50MP OIS मुख्य कॅमेरा 64MP टेलिफोटो कॅमेरा आणि 48MP अल्ट्रावाइड अँगल लेन्स आहे.सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, यात 32MP फ्रंट कॅमेरा आणि मजबूत बॅकअपसाठी 5400mAh बॅटरी आहे. डिव्हाइस 100W SuperVOOC फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतं.
हे वाचलंत का :