पालघर - लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी डहाणू येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास देशाचे कार्टून नेटवर्क होईल, अशी खोचक टीका केली.
पालघर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असलेला बहुजन विकास आघाडी हा विरोधीपक्ष, पक्ष आणि संघटना नसून गुंडांची टोळी आहे. तसेच या गुंडांची नजर येथील आदिवासींच्या जमिनीवर आहे. महायुतीने जर काश्मीरमधील ३७० कलम काढले, तर बहुजन विकास आघाडीदेखील महायुतीत सामिल होऊन आपल्याला पाठिंबा देईल. त्यांना फक्त लोकांच्या जमिनीत रस आहे, असे म्हणत त्यांनी बहुजन विकास आघाडीवर टीका केली आहे.
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आणि विकासासाठी शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना निवडून देण्याचे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले.