ETV Bharat / state

पालघरमध्ये हळदी कार्यक्रमांत गर्दी, किराणा दुकान उशीरापर्यंत सुरू; सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची कारवाई - Palghar corona news

पालघरमध्ये रात्री उशिरापर्यंत किराणा मालाचे व चिकनचे दुकान सुरू ठेवल्याचे समोर आले. तसेच रात्री हळदी कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी आणि कोरोना नियमांचे पालन नसल्याने पालघर सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी धाड टाकून त्यांच्यावर कारवाई केली.

Palghar
Palghar
author img

By

Published : Apr 19, 2021, 1:15 PM IST

पालघर : पालघरमध्ये रात्री उशिरापर्यंत किराणा मालाचे व चिकनचे दुकान सुरू ठेवल्याचे समोर आले. तसेच रात्रीच्या सुमारास हळदी कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी आणि कोरोना नियमांचे पालन नसल्याने पालघर सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी धाड टाकून त्यांच्यावर कारवाई केली. या दोन्ही घटनांमुळे पालघर जिल्ह्यात व्यापारीवर्ग आणि लग्नकार्य सभारंभ आयोजक कोरोना नियम पायदळी तुडवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 'ब्रेक द चेन'च्या माध्यमातून नियमांचे निर्बंध घातले आहेत. या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र या नियमांना नागरिक फाटा देत असल्याचे समोर आले आहे.

पालघर जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी-

पालघर जिल्ह्याचा 16 एप्रिल 2021 रोजीच्या सकाळी 11 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाला हाती आला आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसभरातील रुग्णसंख्या वाढत आहे. पालघर 406, विक्रमगड 21, डहाणू 99, तलासरी 29, मोखाडा 40, जव्हार 153, वाडा 172 अशी तालुकानिहाय रुग्णसंख्या आहे.

अशी कोरोना रुग्णसंख्या आढळत असतानाही पालघर जिल्ह्यातील डहाणू व तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत कोरोना नियमांचे नागरिक काटेकोरपणे पालन करताना दिसत नाहीत. तसेच निष्काळजीपणा करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

हळदी समारंभ, उशीरापर्यंत दुकान सुरू -

पालघर जिल्ह्यातील धुंदलवाडी ग्रामपंचायत हद्दीमधील किराणा व चिकन दुकान सायंकाळी आठ वाजताच्या कालावधीनंतरही चालू होते. या दुकानामधून सामानाची विक्री करण्यात येत होती. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी या दुकानाची तपासणी केली. तसेच दुकान मालकाविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 188 अन्वये तलासरी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शिवाय दुकानही सील करण्यात आले आहे.

तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत बहारे ब्राम्हणवाडी येथे रात्री हळदी समारंभात 50 पेक्षा अधिक लोक होते. तसेच सामाजिक अंतराचा अभाव, इतर नियमांचे पालन नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाई वेळी डहाणू तहसीलदार राहुल सारंग, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या दोन्ही घटनेत कोरोना नियमांचे पालन करण्यात निष्काळजी केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.