ETV Bharat / state

15 हजार रुपये लाचप्रकरणी दोन लोकसेवकांवर कारवाई - पालघर गून्हेवार्ता

अंगणवाडी सेविकेस नोकरीवर कायम करण्यासाठी लाच मागणाऱ्या, एकात्मिक बालविकास प्रकल्प सेविकेला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15 हजाराच्या रक्कमेसह रांगेहाथ पकडले आहे. पोलीस उपअधिक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

15 हज़ारची लाचप्रकरणी दोन लोकसेवकांवर कारवाई

author img

By

Published : Apr 29, 2021, 7:08 AM IST

पालघर - अंगणवाडी सेविका, मदतनीस म्हणून कायम करण्यासाठी महिलेकडून लाचेची मागणी करणाऱ्या, एकात्मिक बालविकास प्रकल्प सेविकेला पालघर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 15 हजार रुपयांच्या रक्कमेसह रांगेहाथ पकडले आहे. यात वाडा बालविकास प्रकल्प अधिकारी व अंगणवाडी सेविकेचा समावेश आहे.

21 हजार रुपयांची मागणी
पालघर जिल्ह्यातील वाडा बालविकास प्रकल्पाचे गोरक्ष खोसे यांनी, एका अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या महिलेकडून नोकरीवर कायम करण्यासाठी 21 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे या महिलेने पालघर येथे लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली होती. या तक्रारदारासह लाचलुचपत विभागाकडून त्याची पडताळणी करण्यात आली आहे.

15 हजार रुपये लाचप्रकरणी दोन लोकसेवकांवर कारवाई

अगोदर २१ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती, त्यानंतर 21 हजारांची तडजोड ही 15 हजार रुपयापर्यंत आली. सायंकाळी 4 च्या सुमारास डाहे येथील कल्पना गवळी या अंगणवाडी सेविकेला 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधिक्षक नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - विलगीकरण कक्षात न राहता बाहेर फिरणाऱ्या 34 कोरोनाबाधितांवर गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.