पालघर पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, Cyrus Mistry Death दुपारी सव्वा 3 वाजण्याच्या सुमारास अहमदाबाद येथून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर सूर्या नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. अपघातात 2 जखमी झाले असून, दोघांचा मृत्यू झाला आहे. ही मर्सिडीज कार होती. Tata group cyrus mistry गाडीचा क्रमांक MH47AB6705 असा आहे. पुढील तपासाची प्रक्रिया सध्या सुरु आहे. palghar district police दुभाजकाला गाडीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिस्त्री यांना श्रद्धांजली टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्का बसल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सायरस मिस्त्री हे केवळ एक यशस्वी उद्योजक नव्हते, तर उद्योग विश्वातील एक तरुण, उमदे आणि भविष्यवेधी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. Accidental death of tata group cyrus mistry एक कर्तबगार उद्योजक आपल्यातून गेला आहे. ही केवळ मिस्त्री कुटुंबियांची नव्हे, तर देशातील उद्योग विश्वाची मोठी हानी आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केली आहे.
सुप्रियाताई सुळेंकडून मिस्त्री यांना श्रद्धांजली सुप्रिया सुळेंनीही सायरस मिस्त्री हे किती साधे होते, याच्या आठवणी सांगितले आहे. ताज हॉटेलमध्ये पती सदानंद सुळे व सायरस मिस्त्री जेवायला गेले असता तिथल्या कर्मचाऱ्यांना वाटलं सदानंद हेच सायरस आहेत. ते जेव्हा म्हणाले आम्ही तुमच्या स्वागताला आलोय, तेव्हा आम्ही सांगितलं हे सदानंद आहेत व तो सायरस आहेत. इतका लो प्रोफाइल व साधा माणूस होता तो पाणीपुरी, साबुदाणा खिचडी करा, असे सांगून आमच्या घरी हक्काने ते येत असायचे असं सांगताना सायरस यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर विश्वासच बसत नसल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हणाले आहे.