ETV Bharat / state

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू - पालघर अपघात

Palghar Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर पालघरच्या मेंढवन घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

accident
accident
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 23, 2023, 10:50 PM IST

पालघर Palghar Accident : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवार (२३ नोव्हेंबर) एक भीषण अपघात झाला. पालघरच्या मेंढवन घाटात एका वळण रस्त्यावर कारचा हा अपघात झाला.

तीन जणांचा जागीच मृत्यू : या अपघातात एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय. मृतांमध्ये एका ५ वर्षीय चिमुकलीचाही समावेश आहे. या अपघातामध्ये जखणी झालेल्या तिघांची प्रकृती जखमी असल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या उपचार सुरु आहेत. मेंढवन घाटातील या अपघातानंतर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी पोहचलं. अपघातप्रवण वळणावर ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातात बळी पडलेले लोक पुण्याचे होते.

या आधीही अनेक अपघात झाले : ही कार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे भरधाव वेगानं जात होती. दरम्यान, मेंढवन घाटात एका धोकादायक वळणावर चालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यानंतर कार समोरुन येणाऱ्या टँकरला जाऊन धडकली. हा अपघातात संपूर्ण कारचा चुराडा झाला आहे. हर्षद गोडबोले (वय ४२ वर्ष), आनंदी गोडबोले (वय ५ वर्ष) आणि ड्रायव्हर मिलिंद वैद (वय ४३ वर्ष) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर हर्षदा गोडबोले (वय ३७ वर्ष) आणि अद्वैत गोडबोले (वय १२ वर्ष) हे जखमी आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथे आतापर्यंत अनेक अपघात झाल्याची माहिती आहे. हा महामार्ग तयार झाल्यापासून मृत्यूचा सापळा बनलाय. येथे शेकडो जणांनी आपले प्राण गमावलेत आहेत. मात्र अद्याप राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.