पालघर - वाडा-मनोर महामार्गावरील पाली येथील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दुचाकीस्वार ठार झाला आहे. हा अपघात बुधवारी रात्री आठ वाजता झाला असल्याची समोर येत आहे. वाडा ग्रामीण रुग्णालयात दुचाकीस्वाराला हलविण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
हेही वाचा - नांदेडमध्ये दरोडेखोरांनी कैचीने भोकसून ज्वेलर्स व्यापाऱ्याचा केला खून, दागिने घेऊन पसार
जयेश लखमा गुरव (वय-27) हा आलोंडा तालुका विक्रमगड येथील रहिवासी होता. वाडा-मनोर रस्त्यावरील कोल्हापूर-डहाणू बस (क्रमांक-एमएच 14 बीटी 1890) व मोटारसायकलीमध्ये पाली येथे अपघात झाला. याप्रकरणी वाडा पोलीसांनी बसचालकाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - मुंबईत लिफ्टमध्ये अडकून महिलेचा मृत्यू