पालघर - वसईत एका मौलानाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग ( Molesting Minor Girl ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटना कळताच स्थानिक नागरिकांनी मौलानाला बेदम चोप देत रस्त्यावरून त्याची मारत धिंड काढत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रविवारी (दि. 27 मार्च) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याबाबत वालीव पोलीस ठाण्यात ( Valiv Police Station ) गुन्हा दाखल झाला आहे. नूरहुल्ला अश्रफ अली शेख (वय 24 वर्षे), असे त्या मौलानाचे नाव आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्याायलयाने 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
-
Maharashtra | A Muslim cleric arrested in Vasai area of Palghar district for allegedly molesting a 10-year-old girl. FIR registered under sections of IPC and POCSO Act. Further action is being taken. The accused will be presented before the court today.
— ANI (@ANI) March 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Maharashtra | A Muslim cleric arrested in Vasai area of Palghar district for allegedly molesting a 10-year-old girl. FIR registered under sections of IPC and POCSO Act. Further action is being taken. The accused will be presented before the court today.
— ANI (@ANI) March 28, 2022Maharashtra | A Muslim cleric arrested in Vasai area of Palghar district for allegedly molesting a 10-year-old girl. FIR registered under sections of IPC and POCSO Act. Further action is being taken. The accused will be presented before the court today.
— ANI (@ANI) March 28, 2022
पीडित मुलगी ही दुकानात पैसे सुटे करण्यासाठी गेली होती. बाजूलाच उभा असलेल्या नूरहुल्लाने मुलीला बोलावून मी तुला सुटे पैसे देतो, असे सांगून पीडित मुलीला कब्रस्तानात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने आरडा ओरड करून पळ काढल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर संतप्त नागरिकांनी केअर टेकर असलेल्या मौलानाला पकडून बेदम चोप देत त्याची धिंड काढत त्याला वालीव पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर पोलिसांनी भा.दं.वि.चे कलम 354 व पोक्सो कलमांसह गुन्हा दाखल करत संशयित आरोपीस अटक केली. पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले आहेत. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश धायगुडे हे करत आहेत.
हेही वाचा - नालासोपाऱ्यात 19 वर्षीय तरुणीवर तिघांनी केला सामूहिक बलात्कार, अल्पवयीन आरोपीला अटक