ETV Bharat / state

वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग

वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग लागली. सुदैवाने या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.

author img

By

Published : Jul 17, 2019, 10:39 AM IST

Updated : Jul 17, 2019, 11:01 AM IST

गाडीला भर रस्त्यात आग

पालघर - वसई न्यायालय परिसरात वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच गाडीतील सर्वजण वेळीच बाहेर पडले. त्यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गाडी पूर्णत: जळून खाक झाली आहे.

पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला आग

वसई पंचायत समितीची गाडी गॅरेजमधून दुरुस्ती होऊन पुन्हा पंचायत समितीकडे जात होती. यावेळी वसई न्यायालय परिसरात भर रस्त्यात या गाडीने अचानक पेट घेतला. घटनेची माहीती मिळताच वसई-विरार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व युद्धपातळीवर ही आग विझवण्यात आली.

Intro:वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग
Body:वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग

नमित पाटील,
पालघर, दि.15/7/2019

वसई न्यायालय परिसरात वसई पंचायत समितीच्या चारचाकी गाडीला भर रस्त्यात आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

वसई पंचायत समितीची गाडी गॅरेजमधून दुरुस्ती होऊन पुन्हा पंचायत समितीकडे जात असताना वसई न्यायालय परिसरात भर रस्त्यात या गाडीने अचानक या पेट घेतला. घटनेची माहीती मिळताच वसई-विरार अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले व युद्धपातळीवर ही आग विझवण्यात आली. आग लागल्याचे कळताच गाडीतील सर्व वेळीच बाहेर पडले त्यामुळे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून, गाडी पूर्णत: जळून खाक झाली.Conclusion:
Last Updated : Jul 17, 2019, 11:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.