पालघर - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नालासोपारा पूर्व मधील एका 13 वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे.
या मुलीचे वडील मुंबईतील रुग्णालयात काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची पत्नी आणि मुलगा यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले होते. मात्र, मुलीचे अहवाल येणे बाकी होते. शनिवारी या 13 वर्षीय मुलीचे अहवालसुद्धा पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या या सर्व रुग्णांवर मुंबई येथे उपचार चालू आहे. वसई-विरारमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 36 वर गेली आहे.