ETV Bharat / state

80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज - corona patients in palghar

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वांचे मनोबल वाढवणारी घटना घडली आहे. सफाळे येथील कोरोनाबाधित 80 वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलीय.

corona in palghar
80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज
author img

By

Published : Jul 18, 2020, 7:59 PM IST

पालघर - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना सर्वांचे मनोबल वाढवणारी घटना घडली आहे. सफाळे येथील कोरोनाबाधित 80 वर्षांच्या आजींनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केलीय. डॉक्टर आणि नर्स यांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा देत त्यांना डिस्चार्ज दिला आहे. आजींनी देखील या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

80 वर्षांच्या आजींची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज
पालघरमधील सफाळे येथे 80 वर्षांच्या आजींना कुटुंबातील एका बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने प्रदुर्भाव झाला होता. त्यानंतर नंडोरे येथील क्वारंन्टाइन सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. वय जास्त असल्याने उपचार करण्यास काही अडचणी आल्या, मात्र आजींच्या जिद्दीपुढे सर्व अडचणींनी लोटांगण घातले. शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य प्रकारे काळजी घेत त्यांच्यावर उपचार केले. या सर्वांच्या प्रयत्नामुळे या 80 वर्षांच्या आजी कोरोनामुक्त झाल्या असून आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.डिस्चार्ज दिल्यानंतर घरी परतताना कोरोनामुक्त झालेल्या या आजींनी डॉक्टर, नर्सेस आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच उपस्थितांनी देखील टाळ्या वाजवून शुभेच्छा देत आजींना निरोप दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.