ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे राजस्थानामधील कोटा येथे अडकलेल्या 52 विद्यार्थ्यांची घरवापसी - राजस्थान कोटा

राजस्थानमधील कोटा येथे पालघरमधील ५२ विद्यार्थी अडकले होते. त्यानंतर राज्य शासनाने सातत्याने राजस्थान सरकारचा पाठपुरावा केल्यानंतर कोटाहून धुळे-नाशिक मार्गे एसटीने पालघरमध्ये आणण्यात आले.

kota rajsthan  student returned from kota rajsthan  राजस्थान कोटा  कोटामधून विद्यार्थ्यांची घरवापसी
लॉकडाऊनमुळे राजस्थानामधील कोटा येथे अडकलेल्या 52 विद्यार्थ्यांची घरवापसी
author img

By

Published : May 2, 2020, 1:29 PM IST

Updated : May 2, 2020, 3:19 PM IST

पालघर - परीक्षेच्या तयारीसाठी राजस्थानमधील कोटा येथे गेलेले 52 विद्यार्थी लॉकडाऊनमुळे महिनाभरापासून अडकून पडले होते. राज्य शासनाच्या प्रयत्नानंतर अखेर या विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आले असून शुक्रवारी रात्री उशिरा हे सर्व विद्यार्थी बसने पालघर येथे दाखल झाले.

लॉकडाऊनमुळे राजस्थानामधील कोटा येथे अडकलेल्या 52 विद्यार्थ्यांची घरवापसी

राजस्थानमधील कोटा येथे पालघरमधील ५२ विद्यार्थी अडकले होते. त्यानंतर राज्य शासनाने सातत्याने राजस्थान सरकारचा पाठपुरावा केल्यानंतर कोटाहून धुळे-नाशिक मार्गे एसटीने पालघरमध्ये आणण्यात आले. यामधील १८ विद्यार्थी पालघर तालुक्यातील बोईसर परिसरातील, तर काही वसई तालुक्यातील आहेत. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पालघरला परतलेल्या या सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. खबरदारीचा उपाय म्हणून परतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तसेच त्यांना 14 दिवस विलगीकरण करण्यात येणार आहे.

राज्य शासनाच्या प्रयत्नाने या विद्यार्थ्यांना परत आणण्यात यश आले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह पालघरमध्ये आणण्यासाठी प्रयत्न केलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भारती कामडी यांचे विद्यार्थ्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

Last Updated : May 2, 2020, 3:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.