वसई - वसईच्या भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात पुरुषाचा अत्यंत कुजलेला अवस्थेत मृतदेह ( Death Body Found Vasai Bhuigaon Coast ) आढळला आहे. 50 वयोगटातील पुरुषाचा हा मृतदेह असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत ( Man Death Body Found ) आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी हा मृत्यू झाला असून, भरतीच्या पाण्याने हा मृतदेह किनार्यावर आला असल्याचे गावकरी सांगत आहेत.
रविवारी ( 17 एप्रिल ) संध्याकाळच्या सुमारास मच्छीमार आणि स्थानिक लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. वसई पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मात्र, अद्यापही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर वृत्त थोड्या वेळात...