विरार (पालघर) जेवणातून विषबाधा झाल्याने एकाच कुटुंबातील दोन मुलांचा मृत्यू झाल्याची children died due to food poisoning in Virar घटना विरारमध्ये घडली. या घटनेतील अन्य तीन मुलांची children died in Virar प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विरार पूर्वेच्या मांडवी येथे अश्फाक खान हा रिक्षाचालक पत्नी आणि ५ मुलांसह राहतो. शनिवारी रात्री तो नेहमीप्रमाणे घरी food poisoning in Virar आल्यानंतर त्याने कुटुंबासह जेवण केले. मध्यरात्री दिड वाजता अचानक मुलांच्या पोटात दुखू लागले आणि त्यांन उलट्या होऊ लागल्या.
हेही वाचा Banana Trunks Rakhi: बनाना फायबरपासून राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या राख्या; पालघर महिला बचत गटाचा उपक्रम
अश्फाक खान यांनी स्थानिक डॉक्टरांकडे दाखवले. त्यावेळी डॉक्टरांनी अन्नातून विषबाधा झाल्याचे सांगून उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र, खान यांनी रात्र झाल्याने सकाळी रुग्णालयात जाण्याचे ठरवले. परंतु, मुलांचा त्रास खूप वाढल्याने पहाटे त्यांना महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आसिफ खान वय ९ आणि मुलगी फरिफ खान वय ८ या दोघा मुलांचा मृत्यू झाला. तर फराना खान वय १०, आरिफ खान वय ४, साहील खान वय ४ या तीन मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेत अश्फाक खान आणि त्यांची पत्नी यांना मात्र कोणताही त्रास झाला नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याबाबत माहिती देताना मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रफुल्ल वाघ यांनी सांगितले की, खान कुटुंबीयांनी घरीच बनवलेला डाळ भात खाल्ला होता. आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठले आहेत. या प्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा Minor Girl Kidnapping अपहरण झालेल्या शाळकरी मुलीची अवघ्या बारा तासात केली सुटका