पालघर - जिल्हा ग्रामीणमध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार 13 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 12 रुग्ण पालघर तालुक्यातील व एक रुग्ण डहाणू तालुक्यातील आहे आहे. पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत एकूण 193 कोरोनाग्रस्त रुग्ण अढळून आले आहेत. यापैकी 109 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पालघर ग्रामीण आज प्राप्त अहवालानुसार बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दातिवरे येथे 8 रूग्ण आढळले यामध्ये पाच महिला व तीन लहान मुलांना समावेश आहे. धुकटन येथील 66 वर्षीय महिलेला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे.
पालघर शहरातील विष्णू नगर परिसरातील 31 वर्षीय व्यक्तीला कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे. पालघरमधील गोकुळ रेसिडेन्सी येथील 41 वर्षीय व्यक्ती डॉक्टर असून त्यांचा दातिवरे येथे दवाखाना आहे. ते कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच नवली येथील 25 वर्षीय व्यक्तीला देखील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली आहे.
डहाणू तालुक्यात सरावली येथे कोरोना रुग्ण आढळला असून एका 25 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला वसई-विरार महानगर पालिकेत आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे.
हेही वाचा - वाड्यातील रस्ता रुंदीकरणास अडथळा ठरणारे अतिक्रमण पाडण्याचे काम सुरू, व्यापारी वर्गाचा विरोध