पालघर - ग्रामीण भागात गेल्या मागील 24 तासांत 101 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले असून दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील 24 तसांत 33 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या चोवीस तासांत उपचारादरम्यान मृत्यू झालेले दोन्ही कोरोनाग्रस्त पालघर तालुक्यातील आहेत. गेल्या चोवीस तासात आढळलेल्या 101 कोरोनाग्रस्तांपैकी तलासरी तालुक्यातील 48, डहाणू तालुक्यातील 28, पालघर तालुक्यातील 18, वार व विक्रमगड तालुक्यातील प्रत्येकी 1 व वसई ग्रामीण भागातील 6 रुग्ण आहेत.
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2 हजार 19 इतकी झाली असून, 27 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 1 हजार 525 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 467 सक्रीय (अॅक्टीव्ह) रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग राज्यात दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी (दि. 17 जुलै) सलग तिसऱ्या दिवशी आठ हजारापेक्षा अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात 8 हजार 308 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 2 हजार 217 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 54.81 टक्के असून आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 1 लाख 60 हजार 357 इतकी झाली आहे.