डहाणू : वीज महावितरण विभागाचा भोंगळ आणि मनमानी कारभार पुन्हा एकदा उघड झाला ( Dahanu Electricity Distribution Department ) आहे. डहाणूतील धानीवरी कोठबीपाडा येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना वीज महावितरण विभागाने एका महिन्याचे एक लाख 29 हजार बिल ( 1 lakh 29 thousand bill for month ) दिले आहे. वार्षिक उत्पन्न 20 हजार रुपयांच्या जवळपास असलेल्या गायकर कुटुंबाला अचानक लाखोंच्या घरात बिल आल्याने सध्या येथील वीज ग्राहक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
तीन बल्ब आणि फॅनचा वापर : डहाणू तालुक्यातील धानीवरी कोटबीपाडा येथील अजीत बाबू गायकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून शासनाने घरकुल योजनेचा लाभ दिला. त्यामुळे घरात अवघे तीन बल्ब आणि एक फॅन इतकाच विजेचा वापर. गायकर कुटुंबाला मागील अनेक महिन्यांपासून 300 ते 600 च्या घरात विज बिल येत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना देखील गायकर कुटुंबीय मागील अनेक महिन्यांपासून या वीज बिलाचा नियमित भरणा करत होते. दरम्यान त्यांना सप्टेंबर महिन्याच वीज बिल या कुटुंबाला तब्बल एक लाख 29 हजार रुपयांच्या घरात आलय. त्यामुळे या वीज बिलाचा भरणा करायचा कसा असा गंभीर प्रश्न गायकर कुटुंबासमोर उभा राहिला आहे.
भोंगळ कारभाराने त्रस्त : तीन बल्ब आणि एका फॅन शिवाय घरात विजेवर चालणार टीव्ही, फ्रिज असे कोणतेही उपकरण नसतानाही लाखोंच्या घरात आलेल्या बिलामुळे गायकर कुटुंबाची झोप उडाली आहे. वीज महावितरण विभाग हे बिल तुम्हाला भरणा करावेच लागेल असे गायकर कुटुंबाना सांगत आहे. धानिवरी कोटबीपाडा येथील अजित गायकर हे एकटे वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभाराने त्रस्त नाही येत. या पाड्यातील 20 पेक्षा अधिक कुटुंब सध्या याच विज बिलाच्या चिंतेत आहेत. यापैकी अनेक कुटुंबांची नाव दारिद्र्यरेषे खाली असून या घरांमधील विजेचा वापर अत्यंत कमी आहे.
वीज ग्राहक नियमितपणे भरणा : महिन्याच्या अखेरीस येणारे 400 , 500 , 600 रुपयांच वीज बिल येथील वीज ग्राहक नियमितपणे भरणा करतात. मात्र तरी देखील येथील अनेक वीज ग्राहकांना 26 हजार, 61हजार, 75 हजार तर काहींना थेट दीड लाखापर्यंत वीजबिल देण्यात आले आहे. हे वीज बिल न भरल्यास घरांवर लावलेले वीज महावितरण विभागाचे मीटर काढून नेण्यात येईल असा इशारा या वीज ग्राहकांना महावितरणकडून देण्यात येत आहे. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून हे वीज ग्राहक आपल्या खिशातील 400 ते 500 रुपये खर्च करून रोज वीज महावितरण विभागाच्या कार्यालयात खेटे मारत आहेत.
वीज महावितरणाचा भोंगळ कारभार : वीज महावितरण विभागाच्या भोंगळ कारभारा विरोधात आपल्याला नेहमीच वीज ग्राहकांचा आक्रोश पाहायला मिळतो . याच वीज महावितरण विभागाच्या अनोगोंदी कारभाराचा ग्रामीण भागातील वीज ग्राहकांनाही मोठा फटका बसत आहे. मात्र ग्रामीण भागातील नागरिकांच्या अशिक्षित पणाचा फायदा घेऊन वीज महावितरण विभागाकडून त्यांची लूट केली जात असून नियमित रीडिंग न घेतल्याने हा प्रश्न उद्भवत असल्याच महावितरणकडून सांगण्यात आले आहे .
रिडिंग घेतले जात नाही : सर्व साधारण गरीब कुटुंब येथे राहत असून महावितरणकडून आलेले बील ते वेळेवर भरतात. पण वेळेवर रिडिंग घेतले जात नसल्याने अंदाजे बील आकारणी केली जाते. याचा त्रास गरीब लोकांना होत आहे. त्या मुळे महावितरण ने वेळेवर रीडिग घेऊन वेळेत विज बिल पाठवावी. अशी मागणी धानीवरीचे सरपंच शैलेश कोरडा यांनी केली आहे