ETV Bharat / state

जेवणाचा फक्कड बेत असलेली वेळ अमावास्या उत्सवात साजरी - farmers news today

जगाला पोसणाऱ्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकरी आजच्या दिवशी काळ्याआईची मनोभावे पूजा करून आपल्या शेतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो.

osmanabad
osmanabad
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:56 PM IST

Updated : Jan 14, 2021, 5:22 PM IST

उस्मानाबाद - कृषी संस्कृतीची साक्ष जागवणारा वेळ अमावास्या हा सण आज उस्मानाबाद लातूर व कर्नाटकच्या काही भागात शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतो. जगाला पोसणाऱ्या काळ्या आईचे ऋण फेडण्यासाठी शेतकरी आजच्या दिवशी काळ्याआईची मनोभावे पूजा करून आपल्या शेतात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करतो.

गाव व शहरांमध्ये असतो शुकशुकाट

सध्या शेतात गहू, ज्वारी, बाजरी, हरभरा, व तुरीचे पीक बहरात आलेले असते, बोर व शेंगा हा रानमेवा ही खाण्याजोगा झालेला आहे. या बहरलेल्या शेतात शेतकरी कडबा अथवा गवताची कोप बनवतो.पांडवांची प्रतिष्ठापना करतात या पांडवांना चुना व शेंदूर लावला जातो. हळद कुंकू यांनी पूजा केली जाते. या पूजेनंतर शेतामध्ये शेत चर शिंपला जातो. या वेळी हर हर महादेव या नामाचा जयघोष केला जातो. तसेच, जेवणाचा फक्कड बेत असतो. वरण, आमटी, भज्जी, आंबील, खीर, शेंगदाण्याच्या पोळ्या असे पदार्थ असतात. आंबील हे विशेष पेय व सर्व भज्यापासून बनवलेली भज्जी (भाजी) हे जेवणाचे खास वैशिष्ट्य असते. याचा स्वाद घेण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात नातेवाईक मित्र व शेतकामाला मदत करणाऱ्या 12 बलुतेदारांना जेवणासाठी आमंत्रण केले जाते. आजच्या दिवशी जवळपास सर्वजण रानभोजनचा आनंद लुटण्यासाठी शेतात जातात. त्यामुळे गाव व शहरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो.

तीन जिल्ह्यात होतो साजरा

मराठवड्यातील तीन जिल्ह्यात हा सण साजरा होतो. माराठवड्यातील लातूर, बीड आणि उस्मानबादमध्ये ही अमावस्या साजरी केली जाते. या गावातील वेगवेगळ्या परंपरेप्रमाणे काही गावात मकसंक्रांतीच्या दिवशी असा जेवणाचा बेत आखला जातो.

पूजा करताना
पूजा करताना

जेवणाचे खास वैशिष्ट्य

  • आंबील - आंबील हे गाई आणि म्हशीच्या 'ताकापासून' बनवले जाते. ताकात शिजवून ज्वारीचे पीठ, लसणाच्या पातीपासून बनवलेले पेस्ट, कोथिंबीर पेस्ट चवीपुरते मीठ हे सर्व पदार्थ एकत्र करून आंबिल बनवली जाते.
  • भज्जी - गाजर, टोमॅटो, बोर, वांगी, बटाटे, घेवड्याच्या, शेंगा, कांद्याची पात, हिरवी मिरची, अशा वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या भाज्या एकत्र करून भाजी तयार केली जाते, याला भज्जी असे म्हणतात.
  • उंडे- बाजरीच्या पिठापासून उंडे बनवले जातात. बाजरीच्या दळलेले पीठ पाण्यात एकत्र केले जाते. त्याचे छोटे छोटे गोळे केले जातात आणि याला शिजवले जाते. हे उंडे आंबील व दुधासोबत खाल्ले जाते.

Last Updated : Jan 14, 2021, 5:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.