उस्मानाबद - गौरी-गणपती हे सणाचे दिवस असल्याने भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडले असल्याचे चित्र ठिक-ठिकाणी पाहायला मिळत आहे. असेच काहीसे चित्र उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजीपाल्यांच्या दुकानात दिसून आले.
हेही वाचा - गौरी गणपती पूजनाचा सोहळा; उत्सवासाठी १०० विविध प्रकारचे नैवेद्य बनवून आज गौरीला दाखवतात
गौरी-गणपती सणानिमित्त घरोघरी सोळा प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात. त्यामुळे सध्या या सर्वच भाज्यांचे भाव वाढले असून साधारणत: सर्वच भाज्या ह्या 50 रुपये प्रति किलो दराप्रमाणे विकल्या जात आहेत.
भाज्या आणि त्यांचे दर -
1) काशी भोपळा - 80 रुपये किलो, 2) शिमला मिरची - 40 रुपये किलो, 3) भेंडी - 50 रुपये किलो, 4) गवार - 50 रुपये किलो, 5) मेथी - 20 रुपये 1 पिंडी, 6) टोमॅटो - 30 रुपये किलो, 7) पालक - 10 रुपये एक पिंडी, 8) पत्ता कोबी - 60 रुपये किलो