ETV Bharat / state

वडगाव ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी तुळजापूर-लातूर महामार्गावर रास्ता रोको

तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख) येथील ग्रामस्थांनी आज तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले.

वडगाव ग्रामस्थांचा विवध मागण्यांसाठी तुळजापूर-लातूर महामार्गावर रास्ता रोको
author img

By

Published : May 14, 2019, 2:15 PM IST

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील वडगाव (लाख) या गावातील ग्रामस्थांनी आज तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन केले. या गावच्या जवळून तुळजापूर-लातूर महामार्गाचे काम सुरू असून या ठिकाणी बायपास रस्ता तयार करावा, तसेच रस्त्यावर दुभाजक उभारून गावातील नागरिकांसाठी मार्ग मोकळा करावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

वडगाव ग्रामस्थांचा विवध मागण्यांसाठी तुळजापूर-लातूर महामार्गावर रास्ता रोको

या महामार्गावर बायपास रस्ता न केल्यामुळे गावातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. गावच्या उत्तर दिशेला अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत. त्यामुळे या महामार्गावरुन शेतावर जाण्या-येण्यासाठी त्यांना अ़़डचण होत आहे. तर वडगावपासून जवळपास ३० गावांनाही या महामार्गामुळे संपर्कासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे वडगाव लाख येथे बायपास रस्ता तयार करावा, तसेच रस्त्यावर दुभाजक उभारावे, प्रवाशी थांबा, विद्युतीकरण आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

येत्या १५ दिवसात ही समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी गावकऱ्यांनी दिला.

Intro:वडगाव लाखच्या ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको, ३० गावांच्या संपर्काचा प्रश्न

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील वडगाव ( लाख ) या गावच्या ग्रामस्थांनी आज राष्ट्रीय महामार्गावर विविध मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केले वडगाव ( लाख ) गावातून परिसरातील शेतकरी विद्यार्थी व जोडणाऱ्या ३० गावाच्या संपर्कांचा प्रश्न निर्माण झालाय ग्रामस्थांनी प्रशासनाला वेळोवेळी मागण्या करूनही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे आम्ही हे आंदोलन करत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या गावच्या जवळून महामार्ग रस्त्याचे काम सुरू असून सर्व्हिस रोड करा व रस्ता दुभाजक उभा करून या गावच्याला व ईतर लोकांनाचा अडवलेला मार्ग मोकळा करा अश्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले वडगाव (लाख ) या गावच्या उत्तर दिशेला अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत महामार्ग शेताला जाण्या येण्याची समस्या निर्माण झाली आहे तर वडगावपासून जवळपास ३० गावाना संपर्कासाठी अडचणी येत आहेत वडगाव लाख येथे सर्विस डिव्हायडर प्रवाशी थांबा विद्युतीकरण आदी सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मागणीसाठी आज रास्ता रोको करण्यात आलाय १५ दिवसात समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलायBody:यात vis व byte आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.