उस्मानाबाद: जिल्ह्यातील जकेकुर नजिक महामार्गावर ट्रक- बसचा भीषण अपघात झाला असून गंभीर जखमींवर उस्मानाबाद व लातूर येथे उपचार सुरु आहेत. सोलापूरहून हैद्राबादच्या दिशेने जाणारा ट्रक क्रमांक KA-56-2229 ला मागून येणारी लालपरी MH-14-BT-2534 जोराची धडक दिल्याने मोठा अपघात झाला. यात अनेक प्रवाशी जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
जखमींचे नावे या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची खालीलप्रमाणे आहेत. अनंत डिगंबर पोद्दार (वय 45 रा. उमरगा), उमाकांत मल्लीनाथ गोगावले (रा.नळदुर्ग वय 47), दगडु भगवान गायकवाड (वय 55, रा.जळकोट) आशितुल्ला फारूक मुलानी (वय 60, उस्मानाबाद), रहीमाना आशितुला मुलानी (वय 50, रा.उस्मानाबाद), फारुक आशितुला मुलानी (वय 45, रा.उस्मानाबाद) शेख हरशन जलीलमीया (वय 4, रा.औसा), अनिल रामचंद्र चव्हाण (वय 35, रा.हांगरगा,तुळजापूर), शिवराय गुरुआप्पा भंगरगे ( वय 62, सालेगाव), श्रीपन कांबळे (वय 62, रा.तुगाव), मंगल श्रावण कांबळे (वय 55), महेश तुकाराम गायकवाड (वय 50, व्हर्टी), बिस्मिल्ला गुलाब शेख (वय 65, रा उस्मानाबाद) ही जखमी आहेत.
या सदर घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बीट जमादार संजय शिंदे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जखमींना उपचारार्थ उस्मानाबाद व लातूर येथे पाठवले असून जखमींवर उपचार सुरु आहेत.