उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील शेतकरी कृष्णा सोनवणे यांनी आपल्या शेतात गवारीची लागवड केली आहे. ती विकण्यासाठी ते मंगळवारी (दि.28 एप्रिल) उस्मानाबाद येथील मंडई आले होते. यावेळी तेथील व्यापाऱ्यांबरोबर गवार विक्रीची चर्चा करत असताना, गाडीवर ठेवलेले त्यांचे गवारीचे पोते चोरीला गेले.
त्यानंतर कृष्णा यांना चोरी झाल्याचे लक्षात येताच गवारीचे पोते काही महिला घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले. यानंतर कृष्णा सोनवणे यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना गवारी असलेल्या पोत्याची चोरी झाली असल्याची माहिती दिली. गवार घेऊन जात असलेल्या महिलांचे फोटोही दाखवले. मात्र, पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यानंतर सोनवणे यांनी पोलिस ठाणे गाठले. येथे आल्यानंतर उलट सोनवणे यांना 'तक्रार देऊन काय होणार जाऊ द्या', असा सल्ला देत घरी जाण्यास सांगितले. सोनवणे यांची तक्रार घेतली नाही, असा आरोप कृष्णा सोनवणे यांनी केला आहे.
हेही वाचा - कोहळा उत्पादक शेतकऱ्यांवर संकट, 30 टन कोहळ्याचा ढिगारा शेतातच