उस्मानाबाद: ड्युटीच्या वेळी रिल्स व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकल्यामुळे कळंब आगारातील लेडी कंडक्टर (Lady Conductor) मंगल गिरी यांना एसटी प्रशासनाकडून निलंबित करण्यात आले होते. मात्र गिरी यांना राजकीय मंडळी व विशेषतः समाजातून जोरदार पाठिंबा मिळाला. त्यामुळेच प्रशासनाने अखेर नमते घेऊन गिरी यांचे निलंबन (Lady Conductor suspension) मागे घेतले आले.
गिरी यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स: मंगल गिरी या कळंब आगारामध्ये महिला कंडक्टर म्हणून काम पाहतात. त्यांनी वेगवेगळ्या गाण्यांवर रिल्स व्हिडिओ बनवले असून ते सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल आहेत. मंगल गिरी यांचे फेसबुक, इंन्स्टाग्रामवर लाखो चाहते आहेत. त्यांच्या रिल्सला लाखो व्ह्यूज मिळतात. वेगवेगळ्या गाण्यावर, वेगवेगळ्या विषयांवर मंगल सागर गिरी यांनी रिल्स बनवले असून फेसबुक, इन्स्टाग्रामवर त्याच्या रिल्सवर अनेक लाइक्स आणि कमेंट आल्या आहेत.
1 ऑक्टोबर रोजी मंगल गिरी यांचे निलंबन करण्यात आले होते. निलंबना प्रकरणी विभाग नियंत्रकांनी खुलासा केला आहे की, ड्राइवर सीटवर बसून व्हिडिओ केल्याने गिरी व कल्याण कुंभार यांचे निलंबन केले आहे. १३ ऑक्टोबर रोजी मंगल गिरी व कल्याण कुंभार यांचे निलंबन आगार व्यवस्थापक यांनी मागे घेतले.
तुळजाभवानीच्या गाण्यावर व्हिडिओ: मंगल गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवनी देवीच्या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला होता. ह्या व्हिडिओला लाखो व्ह्यूज आणि कमेंट आल्या होत्या. मात्र, त्यांच्या या व्हिडिओवर आक्षेप घेत एसटी महामंडळाने त्यांच्यावर १ आँक्टोबर रोजी निलंबनाची कारवाई केली होती. तसेच मंगल यांचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या सहकाऱ्यालाही निलंबित करण्यात आलं होतं.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी मंगल गिरीच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता. निलंबित महिला वाहकाला पुन्हा कामावर घेण्यात यावे अशी मागणी आव्हाड यांनी केली होती. तर त्यांच्यावरील कारवाई चुकीची असून त्यांना चूक सुधारण्याची संधी द्यायाला हवी होती असं रोहित पवार म्हणाले होते.