ETV Bharat / state

ST Employee Suicide in Osmanabad : उस्मानाबादेत एसटी कर्मचाऱ्याची विष घेऊन आत्महत्या; कर्मचाऱ्यांचा सरकारच्या विरोधात टाहो - ST Worker Suicide News

कोर्टात एसटी विलनीकरनाच्या मुद्दावर सुनावणी सुरू आहे. त्यातच आता एका एसटी कर्मचाऱ्याने शुक्रवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यात ( ST employee committed suicide in Osmanabad ) घडली आहे. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह बस स्थानकात आणण्यात आला आहे. हनुमंत अकोसकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांने उस्मानाबादेत आपल्या राहत्या घरी उशीरा रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृतदेह बस आंदोलन स्थळी आणल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण तयार झाले आहे.

ST Employee Suicide in Osmanabad
हनुमंत चंद्रकांत अकोसकर
author img

By

Published : Feb 26, 2022, 1:35 PM IST

Updated : Feb 26, 2022, 3:43 PM IST

उस्मानाबाद - कोर्टात एसटी विलनीकरनाच्या मुद्दावर सुनावणी सुरू आहे. त्यातच आता एका एसटी कर्मचाऱ्याने शुक्रवारी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यात ( ST employee committed suicide in Osmanabad ) घडली आहे. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचा मृतदेह बस स्थानकात आणण्यात आला आहे. हनुमंत अकोसकर असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते तुळजापूर आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांने उस्मानाबादेत आपल्या राहत्या घरी उशीरा रात्री विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. मृतदेह बस आंदोलन स्थळी आणल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भावनिक वातावरण तयार झाले आहे.

उस्मानाबादेत एसटी कर्मचाऱ्याची विष घेऊन आत्महत्या

वाहक हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांचे मूळ गाव कोळेवाडी असून त्यांचे उस्मानाबादमधील गणेशनगर भागात घर आहे. त्यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी दुखवट्यात व आंदोलनात ते सहभागी होते. हनुमंत चंद्रकांत अकोसकर यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी आणि आई वडील आहेत. त्यांच्या या निर्णयाने घरावर व एसटी कर्मचारी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सरकार व प्रशासनाचा भावनाशून्य कारभार पाहायला मिळत असून त्यांना जाग कधी येणार हा प्रश्न येथील नागरिकांने विचारला आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य शासनाच्याविरोधात टाहो -

सरकारच्या नाकर्तेपणामुळे ही आत्महत्या झाल्याचा आरोप एस टी कर्मचाऱ्यांनी केला असून सरकार वेळकाढूपणा करून आमच्या आत्महत्येची वाट पाहतय असा घणाघात त्यांनी केलाय.गेली 2 महिनेहून अधिक काळ संप सुरु असून अनेक कर्मचारी यांच्यावर बेरोजगारी व उपासमारीची वेळ आली आहे

हेही वाचा - ST Worker Strike : एसटी विलीनीकरणाचा अहवाल प्रसिद्ध करता येणार नाही; राज्य सरकारची न्यायालयात माहिती

Last Updated : Feb 26, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.