ETV Bharat / state

उस्मानाबादमध्ये 7 रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधितांची संख्या 52 वर; 9 जण कोरोनामुक्त

बुधवारी रात्री 7 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाल्याने उस्मानाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या 52 वर पोहोचली आहे. यापैकी 9 जण कोरोनामुक्त झाले ही दिलासा देणारी बाब आहे.

osmanabad corona update
उस्मानाबद कोरोना अपडेट
author img

By

Published : May 28, 2020, 12:40 PM IST

उस्मानाबाद- जिल्ह्यात बुधवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 7 जण कोरोना पॉजिटिव्ह आढळले आहेत. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52 वर पोहोचली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर 9 जण कोरोनामुक्त झाले ही बाब दिलासा देणारी आहे.

नव्याने वाढलेल्या 7 कोरोनाबाधितांमध्ये तुळजापूर तालुक्यातील कार्ला या गावातील ३, लोहारा तालुक्यातील जेवळी येथील २, उस्मानाबाद तालुक्यातील धुता येथील 1 आणि उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील 1 रुग्ण यांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हातील कोरोनाचा प्रसार वाढत असल्याचे दिसते आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात 52 लोक कोरोनाबाधित झाले आहेत. यातील बहुतांश लोक हे पुणे मुंबई येथून उस्मानाबाद मध्ये आलेले आहेत. 9 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले ही बाब जिल्ह्यासाठी दिलासादायक असली तरी दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वाढणारा आकडा जिल्हावासियांची चिंता वाढवतो आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.