ETV Bharat / state

'मुख्यमंत्री साहेब, माझ्या पप्पाला या संकटातून बाहेर काढा'; मुलीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

२६ जानेवारी निमित्त शाळेत शुभेच्छा पत्रांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात धनश्री बिक्कड या मुलीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वडिलांची समस्या सांगितली.

धनश्री बिक्कड या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले
धनश्री बिक्कड या मुलीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले
author img

By

Published : Jan 22, 2020, 8:24 PM IST

उस्मानाबाद - कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने माझ्या वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. ते नेहमी आत्महत्येची भाषा करतात. मुख्यमंत्री साहेब, माझ्या वडिलांना या संकटातून बाहेर काढा, असे भावनिक पत्र उस्मानाबाद जिल्ह्याच्या देवळाली गावातील एका शाळकरी मुलीने लिहिले आहे. धनश्री बिक्कड असे या मुलीचे नाव असून ती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकते.

मुख्यमंत्री साहेब माझ्या पप्पाला या संकटातून बाहेर काढा

धनश्रीने हृदयस्पर्शी शब्दांत आपल्या वडिलांच्या व्यथा या पत्रात मांडल्या आहेत. तिचे हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काळी कोंबडी, सोन्याचे अंडी देणारी कोंबडी अशी कडकनाथ कोंबडीची ओळख आहे. मांस आणि अंडी महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबडी संगोपनाचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या निमित्ताने कळंब तालुक्यातील देवळाली येथील आश्रुबा बिक्कड यांची एका कंपनीने चार लाख रुपयांची फसवणूक केली. यामुळे त्यांचा संसार आणि आयुष्य संकटात आले आहे.

हेही वाचा - विम्याची 'ती' रक्कम जीवनानंतर नव्हे जीवनातच; राज्य ग्राहक मंचाने एलआयसीला असा दिला दणका

बिक्कड यांनी इस्लामपूर आणि मुंबई येथे आंदोलन केले. लोक प्रतिनिधींकडे दाद मागितली मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. आश्रुबा यांची फसवणूक झाल्याने ते नेहमी तणावाखाली असतात, घरात चिडचिड तणावाचे वातावरण असल्याने त्यांची मुलगी धनश्री हिला आपल्या वडिलांची चिंता सतावत होती. २६ जानेवारीनिमित्त शाळेत शुभेच्छा पत्रांची स्पर्धा आयोजित केली होती. त्यात धनश्रीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून वडिलांची समस्या सांगितली.

धनश्रीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र -

श्री मुख्यमंत्री साहेब आपणास सा. नमस्कार,
"सर्वात पहिले तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे नाव धनश्री आश्रुबा बिक्कड आहे. मी तीसरी वर्गात जि. प. प्राथमिक शाळा देवळाली, ता.कळंब येथे शिकत आहे. साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत, पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीच्या वेळेला पाऊसच नसतो. मग शेतात काहीच धान उगवत नाही. माझे पप्पा नेहमी टेंशनमध्ये असतात. सारखे चिडचिड करतात. मम्मीवर रागवतात. माझ्यावर पण चिडतात. त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो त्या कडकनाथ घोटाळ्याने वाटोळं केलं. कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळ्यात लय पैसं आडकल. मेलेलं बरं, मरणाशिवाय आता दुसरा पर्यायच नाही, असचं सारखं बोलतात. साहेब मला लय घाबरायला होते. आमच्या शाळेत वाचण्यासाठी पेपर येतो, त्यात पण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात. साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समजुन सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबड्यासाठी दिलेले पैसे परत मिळवून द्या, प्लिज माझ्या पप्पांना मदत करा. आमच्या सरांनी सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना 26 जानेवारी निमित्त शुभेच्छा पाठवा. म्हणून मी हे पत्र तुम्हाला लिहले. चुक भुल माफ करा."

तुमची विश्वासू,
धनश्री आश्रुबा बिक्कड
इ.3 री, जि.प.प्रा.शाळा देवळाली, ता.कळंब, जि.उस्मानाबाद.

Intro:मुख्यमंत्री साहेब माझ्या पप्पाला या संकटातून बाहेर काढा; चिमुकल्या मुलीचे पत्र

उस्मानाबाद - कडकनाथ कोंबडी घोटाळ्याने वडिलांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे ते नेहमी आत्महत्येची भाषा करतात मुख्यमंत्री साहेब माझ्या वडिलांना या संकटातून बाहेर काढा अस भावनिक पत्र जिल्ह्यातील देवळाली गावातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या धनश्री बिक्कड या मुलीनं लिहिले आहे तिने या पत्रात अत्यंत हृदय स्पर्शी शब्दात आपल्या वडिलांच्या व्यथा मांडल्या आहेत हे पत्र सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे... काळी कोंबडी , सोन्याचे अंडे देणारी कोंबडी अशी कडकनाथ कोंबडीची ओळख ... मांस व अंडे महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कडकनाथ कोंबडी संगोपनाचा व्यवसाय सुरु केला मात्र उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील देवळाली येथील आश्रुबा बिक्कड यांची एका कंपनीने ४ लाखांची फसवणूक केल्याने त्यांचा संसार व आयुष्य पूर्णतः उध्वस्त झाले आहे. दुष्काळाच्या स्तिथीत शेती पूरक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला मात्र हा व्यवसाय अंगलट आला , कंपनीने त्यांची फसवणूक केली . बिक्कड यांनी इस्लामपूर व मुंबई येथे आंदोलन केले लोकप्रतिनिधीकडे दाद मागितली मात्र त्याना न्याय मिळालेला नाही . सध्या आश्रुबा व त्यांचे कुटुंब तणावाखाली आहे.आश्रुबा यांची फसवणूक झाल्याने ते नेहमी तणावाखाली असतात , घरात चिडचिड तणावाचे वातावरण असल्याने त्यांची मुलगी धनश्री चिंताग्रस्त बनली होती . शाळेत २६ जानेवारी निमित्त शुभेच्छा पत्रांची स्पर्धा आयोजित केली होती त्यात धनश्री हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना पत्र लिहून वडील कडकनाथ कोंबडी प्रकरणात तणावात असून आत्महत्यांची नेहमी भाषा करतात , मला याची भीती वाटते त्यामुळे वडिलांना मदत करण्याची आर्त हाक मुख्यमंत्री याना दिली आहे. 
धनश्रीने पत्रात मांडलेली व्यथा व विदारक वास्तव तिच्या शिक्षकांनी वाचली व ते पत्र वाचून तिच्या घरच्यांना फोन केला हेच पत्र आता सोशल मीडियावर ती चर्चेचा विषय ठरते आहे

या पत्रात ती म्हणतेय...

श्री मुख्यमंत्री साहेब आपणास सा.नमस्कार

सर्वात पहीले तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.माझे नाव धनश्री आश्रुबा बिक्कड आहे.मी तीसरी वर्गात जि.प.प्रा शाळा देवळाली ता.कळंब येथे शिकत आहे.साहेब माझे पप्पा शेतकरी आहेत. पण आमच्या उस्मानाबाद जिल्ह्य़ात पेरणीच्या वेळेला पाऊसच नसतो.मग शेतात काहीच धान उगवत नाही.माझे पप्पा नेहमी टेंशन मध्ये असतात.सारखे चिडचिड करतात.मम्मींवर रागवतात.माझ्यावर पण चिडतात त्यांच्या तोंडुन एकच शब्द निघतो त्या कडकनाथ घोटाळ्याने वाटोळं केल.कडकनाथ कोंबड्याच्या घोटाळ्यात लय पैसं आडकल नेहमी मेललं बरं मरणाशिवाय आत्ता दुसरा पर्यायच नाही.असच सारख बोलतात साहेब मला लय घाबरायला होते.मला फार भिती वाटते आमच्या शाळेत वाचण्यासाठी पेपर येतो त्यात पण शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या बातम्या येतात.साहेब आमच्या पप्पाला तुम्ही समझुन सांगा. त्यांना त्या कडकनाथ कोंबड्यासाठी दिलेले पैसे परत मिळवुन द्या प्लिज माझ्या पप्पांना मदत करा.आमच्या सरांनी सांगितल की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना 26 जानेवारी निमित्त शुभेच्छा पाठवा म्हणून मी हे पञ तुम्हाला लिहले.चुक भुल माफ करा.

तुमची विश्वासु
धनश्री आश्रुबा बिक्कड इ.3 री
जि.प.प्रा.शाळा देवळाली ता.कळंब जि.उस्मानाबाद.

Byte क्र1 - मारुती खुडे (शिक्षक)

Byte क्र2 - धनश्री बिक्कड

Byte क्र3 - आश्रुबा बिक्कड वडील Body:हे एडिट करून पाठवत आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.