ETV Bharat / state

परांड्यात वाळू माफियांचा धुमाकूळ; तहसीलदाराच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर

वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात केळकर गंभीर जखमी झाले आहेत.

वाळू माफिया
वाळू माफिया
author img

By

Published : Dec 14, 2019, 9:19 AM IST

Updated : Dec 14, 2019, 10:50 AM IST

उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये वाळू माफियांनी पुन्हा उच्छाद मांडला आहे. वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवरती कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. परांडा तालुक्यातील सीना प्रकल्पात हा प्रकार घडला.

तहसीलदारांच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर

शनिवारी पहाटे ही घटना घडली. तहसीलदार अनिल हेळकर यांना उपचारासाठी बार्शी येथील मामासाहेब जगदाळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सीना प्रकल्पात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याची माहिती तहसील विभागाला मिळाली होती. त्यानुसार तहसीलदार अनिल हेळकर हे कारवाई करण्यासाठी गेले.

कारवाई दरम्यान तहसीलदार अनिल हेळकर यांच्या अंगावर वाळूने भरलेला ट्रॅक्‍टर घालण्यात आला. यात केळकर गंभीर जखमी झाले आहेत. अंगावरून ट्रॅक्‍टर गेल्याने त्यांचा कंबरेचा भाग मोडला असल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेमुळे वाळू माफियांची दादागिरी पुन्हा समोर आली आहे. आरोपी सध्या फरार आहेत. पोलिसांनी वाळू माफियांची वाहने ताब्यात घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे.

Intro:वाळू माफियांचा हैदोस तहसीलदारांच्या अंगावर चढवला ट्रॅक्टर

उस्मानाबाद - जिल्ह्यामध्ये हे कायद्याचा धाक कमी झाला असून वाळू माफिया चा पुन्हा एकदा उच्छाद मांडला आहे आज जिल्ह्यातील परंडा तालुक्यात येथे सिना प्रकल्पातील वाळू उपसा करणाऱ्या बाळू माफियांवरती कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदार अनिल हेळकर यांच्या वरती ट्रॅक्टर घालून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे आज सकाळी साधारण पाचच्या दरम्यान ची घटना घडली असून तहसीलदार अनिल केळकर यांना प्रथम उपचारासाठी बार्शी येथील मामासाहेब जगदाळे येथे दाखल करण्यात आले आहे या प्रकल्पात बेकायदेशीर रित्या चालणाऱ्या वाळू उपसया सुरू होता या वेळी कारवाई करण्यासाठी गेलेले तहसीलदार अनिल केळकर हे गंभीररीत्या जखमी झाले असून अनिल हेळकर यांच्या अंगावरून ट्रॅक्‍टर गेल्याने त्यांचा कमरेचा भाग मोडला असल्याचे सांगण्यात येत आहे परंडा भोत्रा रोडवर ही घटना घडली असून यामुळे वाळू माफियांची दादागिरी पुन्हा समोर आले आहे हे आरोपी सध्या पसार झाले असून पोलिसांनी इतर वाळू माफियांचे वाहने ताब्यात घेतले आहेतBody:यात vis आहेConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Dec 14, 2019, 10:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.