उस्मानाबाद - आगामी विधानसभा निवडणुकीत संभाजी ब्रिगेड राज्यात 100 जागा लढवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी येथे स्पष्ट केले. राज्यातील विधानसभा निवडणुकीला आणखी बराच कालावधी शिल्लक आहे. मात्र, तरी संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यातील विधानसभा उमेदवार जाहीर केले आहेत. याबरोबरच त्या विधानसभा उमेदवारांचा प्रचार देखील सुरू केला आहे.
हेही वाचा - लँडर विक्रम 'क्रॅश' झालेले नाही, ऑर्बिटर आणि लँडरदरम्यान संपर्क अद्यापही कायम - माजी इस्रो संचालक
उस्मानाबाद-कळंब विधानसभा मतदारसंघातील संभाजी ब्रिगेडचे उमेदवार डॉ. संदीप तांबरे यांच्या प्रचारासाठी आज (शनिवारी) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, प्रदेश सचिव सौरभ खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली कळंब शहरात रॅली काढण्यात आली. यानंतर मेळावा घेत प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.
हेही वाचा - जळगावच्या विद्यापिठात कवयित्री बहिणाबाई अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यास मान्यता
दरम्यान, राज्य शासनाने गडकिल्ल्यांबाबत जो निर्णय घेतला होता, तो दुर्दैवी आहे. केंद्रापासून ते राज्यापर्यंत खासगीकरण करण्याकडे हे सरकार झुकले आहे, अशी टीका प्रदेश सचिव खेडेकर यांनी केली. तर गड-किल्यांचा निर्णय हा जनरोषामुळे माघारी घेतला आहे. याबरोबरच पुढे याप्रकारचे निर्णय घेतले तर प्रत्युत्तर देण्यासाठी संभाजी ब्रिगेड सक्षम असल्याचा दावाही खेडेकर यांनी केला.