उस्मानाबाद - जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे. याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, या संचारबंदीला जिल्ह्यातील रामवाडी ग्रामपंचयातने ठेंगा दाखवत सिमेंट रस्त्याचे काम सुरू केले आहेत.
या रस्त्याच्या कामासाठी 20 ते 25 मजूर एकत्र येऊन हे रस्त्याचे काम करत आहेत. जिल्ह्यातील पोलीस पाच माणसे एकत्र आल्यानंतर आणि रस्त्याने फिरत असताना देखील पोलिसी खाक्या दाखवत आहे. मात्र, रामवाडी या गावात सुरू करण्यात आलेल्या या कामाकडे ग्रामसेवकाबरोबरच सर्वांनीच डोळेझाक केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. एखादा कोरोनाग्रस्त गावात येईल, अशी भीती गावकऱ्यांना आहे.
हेही वाचा -