उस्मानाबाद- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यंदाच्या विद्युत रोषणाईचे खास आकर्षण म्हणजे राजेशहाजीमहाद्वारावर थ्रीडी चित्ररुपात छञपती शिवाजी महाराज भवानी तलवार देताना तसेच देवी महिषासुराचा वध करताना, छञपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसलेले तसेच महाराज गडावरवरुन पाहताना यासह अनेक चिञ थ्रीडी चित्र रुपात महाद्वारासमोर भाविकांना दिसणार आहेत. श्रीतुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज यांचे अन्यन संबध थ्रीडीचित्ररुपात या महाद्वारावर साकारले आहेत.
या मंदीर परिसर भागात एलईडी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई शारदीय नवरात्र उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. ही आकर्षक विद्युत रोषणाई पुण्याचे देवीभक्त संजय टोळगे व विजय उंडाळे मोफत सेवा रुपी गेल्या सात वर्षांपासून करुन देत आहेत. यासाठी बारा कामगार सात दिवसांपासून हे काम करीत आहेत.ही विद्युत रोषणाई वर्षभर भाविकांसाठी खुली असणार आहे.