ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक आणि दिवाळीमुळं फटाक्यांच्या किंमतीत 10 टक्के वाढ

विधानसभा निवडणुक आणि दिवाळीचा सण एकत्रच आल्यानं यंदा फटाक्यांच्या किमतीमध्ये 5 ते 10 टक्के वाढ झाली आहे.

FireCrackers Price Hike
फटाक्यांच्या किमतीत वाढ (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 7:49 PM IST

Updated : Oct 29, 2024, 9:57 PM IST

ठाणे : दिवाळी सणानिमित्त बाजारपेठा फुलल्या असून फटाक्यांच्या बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे निवडणुका आणि दुसरीकडे दिवाळीचा सण यामुळं फटाक्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करणे, दिवाळी, उमेदवारांच्या प्रचारफेऱ्या व नेत्यांच्या सभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक निकालाचा जल्लोष यामुळं यंदा फटाके विक्रेत्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे.

फटाके खरेदीसाठी लहानग्यांची गर्दी : गेल्या वर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या किमतीत 5 ते 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पर्यावरणपूरक फटाके खरेदीकडे नागरिकांचा कल असल्याचं विक्रेते विक्रेते सांगत आहेत. तर धूर करणाऱ्या फटाक्यांची मागणी यंदा घटली आहे. बाजारपेठांमध्ये फटाके खरेदीसाठी लहानग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. दिवाळीत वर्षभर तयार होणारे फटाके मोठ्या प्रमाणात विकले जातात. शिवा काशीवरून येणाऱ्या फटाक्यांची संख्या सर्वाधिक असते, असं फटाके विक्रेते सांगतात.

बाजारपेठांमध्ये फटाके खरेदीसाठी गर्दी (Source - ETV Bharat Reporter)

निवडणुका प्रचारात देखील वापर : प्रचारात निवडणुकांमध्ये देखील फटाक्यांची मोठी मागणी असते. प्रचारात लोकांचं ध्यान आकर्षण करून घेण्यासाठी फटाके फोडले जातात. तसंच निवडणुकीच्या निकालानंतरही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. सभांच्या ठिकाणी देखील फटाके वाजवले जातात, त्यामुळं यंदा निवडणुका आणि दिवाळी एकत्र आल्यानं फटाक्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.

FireCrackers Price Hike
बाजारपेठांमध्ये फटाके खरेदीसाठी गर्दी (Source - ETV Bharat Reporter)

हेही वाचा

Last Updated : Oct 29, 2024, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.