ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2019; उस्मानाबाद जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्सची प्राथमिक तपासणी - उस्मानाबाद जिल्हाधिकारी news

उस्मानाबाद जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशिन व इतर साहित्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली.

उस्मानाबाद जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्सची प्राथमिक तपासणी
author img

By

Published : Aug 21, 2019, 8:47 AM IST

उस्मानाबाद - केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथून आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व इतर साहित्य प्राप्त करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. या सुचनांना अनुसरून उस्मानाबाद जिल्हा निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी तिरुचिरापल्ली येथून ईव्हीएम मशीन ताब्यात घेतले.

विधानसभा निवडणुक 2019; उस्मानाबाद जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्सची प्राथमिक तपासणी

बंगळूर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीच्या 5 अभियंत्यांनी या सर्व मशिन्सची तपासणी केली. पिंपरीतील शासकीय गोदामांमध्ये पोलिस बंदोबस्तात इतर सर्व ईव्हीएम, व्हीव्हीपॅटच्या तपासणीची सुरुवात झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रथम स्तरीय तपासणीकरिता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी विनंती पत्र पाठवण्यात आली होती. त्या अनुषंगाने तपासणीवेळी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीनवर मतदान करून मतदान यंत्राची पडताळणी केली. तपासणी करत असताना अभियंत्यांच्या निर्देशानुसार ज्या मशीन्समध्ये प्राथमिक तपासणी वेळी दोष आढळले, त्या फॉल्टी म्हणून रद्द करण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली दिली आहे.

Intro:विधानसभा निवडणुकीची तयारी जिल्ह्यात ईव्हीएम मशीन दाखवणे

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली येथून आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने BU-920,CU-1680 व VVPAT-1780 प्राप्त करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या त्यानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी तिरुचिरापल्ली येथून ईव्हीएम मशीन ताब्यात घेऊन जिल्ह्यातील पिंपरी येथील शासकीय गोदामांमध्ये पोलीस बंदोबस्तात या मशीन ठेवण्यात आल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने या मशिनची तपासणी करण्यात आली बेंगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनीचे 5 अभियंत्यांनी ह्या मशीन तपासनी केली ईव्हीएम व्हीव्हीपॅट च्या तपासणीसाठी पिंपरी येथील शासकीय ईव्हीएम गोदामांमध्ये पोलिस बंदोबस्तात सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या प्रथम स्तरीय तपासणीकरिता राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहण्यासाठी विनंती पत्र देण्यात आली होते त्या अनुषंगाने पिंपरी येथे ईव्हीएम मशीन ची तपासणी करण्यात आली यावेळी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांच्या प्रतिनिधींनी ईव्हीएम मशीन वरती मतदान करून मतदान यंत्राची पडताळणी केली यावेळी भारती इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्या अभियंत्यांच्या निर्देशानुसार या मशीनच्या प्रथम तपासणी वेळी तांत्रिक दोष आढळलेल्या मशीनची फॉल्टी म्हणून रद्द करून बाजूला ठेवण्यात आल्या अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिली

Body:यात जिल्हाधिकारी कार्यालयाचे vis आहेत

Conclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.