उस्मानाबाद - विजेचा शॉक लागून जिल्ह्यातील एका पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रामेश्वर मोहिते (वय 28) असे मृत्यू झालेल्या पोलिसाचे नाव आहे.
चिखली येथील रहिवासी असलेले रामेश्वर मोहिते हे सोलापूर पोलीस दलातील बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत होते. शनिवारी रामेश्वर मोहीते सुट्टी असल्याने गावी आले होते. रिकाम्या वेळेत दुपारी ते कामानिमित्त शेतात गेले असताना तेथे त्यांना विजेचा धक्का बसला. यावेळी नातेवाईकांनी त्यांना त्वरित उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र,डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. रामेश्वर यांचा चार महिन्यांपूर्वीच लॉकडाऊनमध्ये विवाह झाला होता. वयाच्या 28 वर्षीच रामेश्वर यांच्या अपघाती निधनाने चिखली गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, बहीण असा परिवार आहे.
हेही वाचा - आयुर्वेदिक डॉक्टर संपावर, कोरोना रुग्णांच्या उपाचारावर परिमाण होण्याची भीती