ETV Bharat / state

उस्मानाबादेत रुग्णांची पिळवणूक; पोलिसांकडून आकारला जातोय दंड - police take fine

ग्रामीण भागाची वाहिनी म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बससेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील लोकांची आणि विशेष करून रुग्णांची फरफट होत आहे.`

osmanabad
उस्मानाबादेत रुग्णांची पिळवणूक...
author img

By

Published : Jul 13, 2020, 3:57 PM IST

उस्मानाबाद - कोरोना विषाणूमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लहान मोठे सर्व उद्योग ठप्प असतानाही गृहखाते आणि पोलीस आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. ग्रामीण भागाची वाहिनी म्हणून एसटी बसकडे पाहिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बससेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील लोकांची आणि विशेष करून रुग्णांची फरफट होत आहे. याच संधीचा फायदा पोलीस घेत असल्याचे दिसून येत आहे. मोटरसायकलवरती डबलसीट बसवल्याच्या कारणाने दंड आकारला जात असून, याच नियमावरती बोट ठेवून पोलीस रुग्णांची पिळवणूक करत असल्याचा प्रकार उस्मानाबादमध्ये समोर आला आहे.

उस्मानाबादेत रुग्णांची पिळवणूक...

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील सत्यशील कुलकर्णी हे गेली कित्येक दिवसापासून विविध आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे यांना आठवड्यातील चार दिवस डायलिसिससाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात यावे लागते. हीप्परगा (रवा) ते उस्मानाबाद हे साधारण 60 किलोमीटरचे अंतर आहे. बससेवा बंद असल्याने कुलकर्णी हा प्रवास मोटरसायकलने करत आहेत. यातही अडचणींची बाब म्हणजे कुलकर्णी यांना गाडी चालवता येत नाही. त्यामुळे ते पुतण्या संकेत कुलकर्णी किंवा घरातील इतर सदस्याला घेऊन जिल्हा रुग्णालयात जातात. डायलिसिससाठी त्यांना ठरावीक वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे या वेळेतच जिल्हा रुग्णालयात कुलकर्णी यांना यावं लागतं. मात्र, पोलिसांचा अतिरेक वाढल्याने यांना ठराविक वेळेत जिल्हा रुग्णालयात पोहोचता येत नाही.

दरम्यान, हिप्पारगा या त्यांच्या गावातून निघाल्यानंतर तुळजापूर पोलिसांना तोंड देऊन आणि 200 रुपये दंड देऊन पुन्हा उस्मानाबाद शहरातील पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर डबल सीट असल्याकारणाने त्यांना इतर ठिकाणी पोलीस अडवतात आणि त्यांच्याकडून साधारणपणे दोनशे रुपये दंड घेतात. जिल्हा रुग्णालयात येण्यासाठी त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांचे पत्र आणि ओळखपत्र देण्यात आले आहे. हे पत्र आणि ओळखपत्र वारंवार पोलिसांना दाखवूनही पोलीस ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांचा जीव वाचवण्यासाठी डबलसीटचा नियम करण्यात आला आहे की लोकांना आर्थिक भुर्दंड भरण्यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे का? हा प्रश्न आता विचारला जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.