ETV Bharat / state

पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा नव्हे.. हत्येचा प्रयत्न; पोलीस कर्मचार्‍याला अटक - हत्या

उस्मानाबादमध्ये एका महिला पोलीस उपनिरिक्षकाने ३१ मे रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर आता मी आत्महत्येचा प्रयत्ने केला नसून माझी हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असा जवाब स्वतः पिडित महिला पोलीस उपनिरिक्षकाने दिला आहे.

पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्येचा प्रयत्न नव्हे, हत्येचा प्रयत्न
author img

By

Published : Jun 30, 2019, 7:51 PM IST

Updated : Jun 30, 2019, 8:23 PM IST

उस्मानाबाद - उस्मानाबादमध्ये एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने ३१ मे रोजी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. मी आत्महत्येचा प्रयत्न केला नसून मला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन ढकलून दिले, असा जवाब स्वतः पीडित महिला पोलीस उपनिरिक्षकांनीच दिला आहे.

पोलीस उपनिरीक्षकाचा आत्महत्येचा नव्हे, हत्येचा प्रयत्न

पीडित महिला पोलीस उपनिरिक्षकाच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. सुरुवातीला याप्रकरणी त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक खाडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असा संशय व्यक्त केला जात होता. त्यामुळे पोलीस निरीक्षक खाडे व इतर काही लोकांवरती आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, आता पीडितेने दिलेल्या जवाबामध्ये पोलीस मोटार परिवहन विभागातील पोलीस कर्मचारी आशिष ढाकणे याने मला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकून दिले असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे शनिवारी (२९ जून रोजी) भादंवि कलम ३०७ वाढविण्यात आले असून आरोपी पोलीस नाईक ढाकणे यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा तपास मोतीचंद राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी हे करीत आहेत.

Intro:पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्येचा प्रयत्न नव्हे हत्येचा प्रयत्न; पोलिस कर्मचार्‍याला अटक

पोलीस उपनिरीक्षक मनीषा गिरी यांनी ३१ मे रोजी सकाळी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आता या प्रकरणाला वेगळं वळण लागले असून मनीषा गिरी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला नसून त्यांना इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ढकलून दिले असा जवाब मनीषा गिरी यांनीच दिला आहे मनीषा गिरी यांची तब्येत आता सुधारणा झाली आहे सुरुवातीला याप्रकरणी गिरी यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता यावेळी पोलीस निरीक्षक खाडे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा संशय व्यक्त केला जात होता त्यामुळे पोलीस निरीक्षक खाडे व इतर काही लोकांवरती आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र आता मनीष गिरी यांनी दिलेल्या जवबा मध्ये पोलीस मोटार परिवहन विभागातील पोलीस कर्मचारी आशिष ढाकणे यांने मनीषा गिरी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उचलून खाली फेकून दिले असल्याचे म्हटले आहे त्यामुळे आज 29 जून रोजी भांदवी कलम 307 वाढविण्यात आले असून आरोपी पोलीस नाईक ढाकणे यास अटक करण्यात आली आहे सदर गुन्ह्याचा तपास मोतीचंद राठोड उपविभागीय पोलिस अधिकारी हे करीत आहेतBody:यात हॉस्पिटलमधील vis आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
Last Updated : Jun 30, 2019, 8:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.