ETV Bharat / state

Osmanabad Crime: लॉजवर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश; 12 जणांना ठोकल्या बेड्या - लॉजवर पुन्हा वेश्या व्यवसाय‌ जोमात सुरू

Osmanabad Crime: उस्मानाबाद जिल्ह्यातील हॉटेल व लॉजवर पुन्हा वेश्या व्यवसाय‌ जोमात सुरू झाला police expose prostitution racket आहे. यासाठी गुजरात आणि बंगाल मधून महिलांना आणले जात असून हा व्यवसाय करणारे रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले

Osmanabad Crime
Osmanabad Crime
author img

By

Published : Nov 23, 2022, 3:25 PM IST

उस्मानाबाद: Osmanabad Crime: उस्मानाबाद जिल्ह्यातील हॉटेल व लॉजवर पुन्हा वेश्या व्यवसाय‌ जोमात सुरू झाला police expose prostitution racket आहे. यासाठी गुजरात आणि बंगाल मधून महिलांना आणले जात असून हा व्यवसाय करणारे रॅकेट मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहे. हा व्यवसाय करुन घेणाऱ्या व चालविणाऱ्या ३ हॉटेल व लॉज चालकांसह १२ ग्राहकांवर कारवाई करून त्यांना अटक केली आहे.

कायदेशीर कारवाई: याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांसह पथक जिल्हातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी काल दि.२१ नोव्हेंबर रोजी गस्तीस होते. गस्ती दरम्यान पथक उमरगा शहरात गेले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली. उमरगा येथील हर्ष लॉज, सुहाणा लॉज आणि अभिराज हॉटेल या ३ हॉटेल- लॉजचे चालक, मालक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवून घेत आहेत.

वेश्या व्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश

3 वेगवेगळे पथक तयार : यावर पथकाने ही माहिती पोलिस अधीक्षकांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरगा रमेश बरकते, उमरगा पोलिस ठाण्याचे पोनि मनोज राठोड, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोनि के.एस. पटेल, पोउपनि चाटे यांच्यासह पोलिस अंमलदार यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी 3 वेगवेगळे पथक तयार करुन दि. २१ नोव्हेंबर रोजी ११ ते दि.२२ नोव्हेंबर रोजी १ वाजण्याच्या सुमारास नमूद तीन्ही लॉजवर छापे टाकले असता, ४ पिडीत महिला गुजरात आणि पश्चिम बंगाल असे बाहेर राज्यातून आणून त्यांच्याकडून वैश्या व्यवसाय करुन घेत आहेत.

सदर गुन्ह्याचा तपास : लॉज आणि हॉटेल चालक, मालक, ग्राहक असे एकूण १२ व्यक्तींना उमरगा पोलिस ठाण्यात त्यांच्या विरुध्द मानवी अनैतीक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलम ३, ४, ५ सह भादंसं कलम ३७०, ३७० (अ) (२) प्रमाने ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करुन सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस अधिक्षक एम. रमेश, उपविभागीय पोलिस अधिकारी, उमरगा रमेश बरकते व उस्मानाबाद येथील अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे पोनि पटेल हे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.