उस्मानाबाद - विधानसभा निवडणुकीला काही दिवसच शिल्लक राहिला आहेत. पोलीस प्रशासनाने निवडणुकीच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. निवडणुकीसाठी स्थानिक जिल्हा पोलीस दलाच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र दलाच्या 4 तुकड्या आणि 1 हजार 47 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत.
त्याचबरोबर निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील एकूण 662 शस्त्र परवाना धारकांचे शस्त्र जमा करून घेण्यात आली आहेत. तर विशेष मोहिमेतंर्गत 1 गावठी कट्टा आणि 9 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. तर 808 लोकांवर बिगर जामिनीचे वॉरंट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - मी शरद पवारांसारख फक्त बोंबलत फिरत नाही - उद्धव ठाकरे
जिल्हाभरात 30FST व 29 SST पथके कार्यरत करण्यात आले आहेत. तर शांततेस बाधा येऊ नये, यासाठी 1 हजार 100 लोकांवर विविध कलमांतर्गत प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली आहे. तर 6 लोकांवर तडीपारीची कारवाई करण्यात येणार आहे.
हेही वाचा - काँग्रेसने आमचा जाहीरनामा चोरला; प्रकाश आंबेडकरांचा आरोप