उस्मानाबाद - प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेपासून कळंब तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत. कळंब तहसील प्रशासनाच्या ढिसाळ कामगिरीमुळे जवळपास सोळा हजार शेतकरी वंचित असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे शेतकरी नाराज आहेत.
हेही वाचा- स्टेट बँकेचे एटीएम कार्ड अधिक सुरक्षित; 'हा' केला नवा बदल
देशातील शेतकऱ्यांना मदतीपोटी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजना सुरू केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारांची पेन्शन मिळणार होती. यात एका टप्प्यात दोन प्रमाणे तीन टप्प्यात ही मदत शेतकऱ्यांना मिळणार होती. मात्र, कळंब तालुक्यातील 46 हजार शेतकरी पात्र असताना देखील केवळ 29 हजार शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला आहे. तालुक्यातील जवळपास 16 हजार 494 शेतकऱ्यांची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड केली नसल्याने या योजनेच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत आहे. त्याचबरोबर ज्या २९ हजार शेतकऱ्यांची नोंदणी प्रशासनाने केली आहे. त्यातही प्रशासनाकडून बऱ्याच चुका झाल्या असल्याचे जिल्हाधिकऱ्यांनी सांगितले.