उस्मानाबाद - शहरातून जाणाऱ्या प्रमुख तुळजापूर-औरंगाबाद या मार्गासह इतर रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले आहे. ही जनावरे ऐन रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण असून लहान-मोठे अपघातही घडत आहेत.
Conclusion:

ही जनावरे पकडण्यासाठी पालिकेने पथक नेमले. मात्र, अशा कारवाईनंतरही मोकाट जनावरांचा उपद्रव कमी झालेला नाही. त्यामुळे उस्मानाबाद नगरपालिकेत झालेल्या सर्वसाधारण सभेत मोकाट जनावरांच्या मालकाविरुद्ध खटले भरण्याचा निर्णय घेण्यात आला. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी सर्वसधारण सभेला सुरुवात झाली. काही विषयांवर चर्चा झाली असता, ऐन रस्त्यांवर ठिय्या मांडणाऱ्या मोकाट जनावरांचा मुद्दा उपस्थित झाला. मागील बैठकीत मोकाट जनावरे पकडण्यासाठी पालिकेच्या पथकास नेमले होते. त्यानुसार कार्यवाही करण्यात आली. परंतु, मोकाट जनावरांवर कारवाई केल्यानंतर संबंधित मालक पुन्हा जनावरे सोडून देत आहेत. त्यामुळे सदरील प्रश्न कायम असल्याचे काही सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. यानंतर नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी जनावरांच्या मालकाविरुद्धच गुन्हा दाखल करण्यात येईल असे पालिकेच्या पथकास सांगितले.