उस्मानाबाद - जिल्ह्यात वार्षिक सरासरीप्रमाणे जून ते डिसेंबर महिन्यांपर्यंत सातशे मिमी पाऊस होतो. मात्र, यावर्षी डिसेंबर महिना येण्यापूर्वीच 700 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला असून 731.07 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक पाऊस हा उमरगा तालुक्यात झाला असून त्याखालोखाल लोहारा तालुक्याचा क्रमांक लागतो.
यंदा वार्षिक सरासरीप्रमाणे सर्वच तालुक्यात शंभर टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मात्र, यावर्षीच्या सरासरीप्रमाणे परंडा तालुक्यात कमी पाऊस झाला आहे. उमरगा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून परतीच्या पावसाने हाहाकार उडवला आहे. कित्येकांच्या घरात पाणी शिरले, अनेकांचे सोयाबीन, कडबा वाहून गेले आहे. लोहारा तालुक्यातील गांजा वडगाव येथे जवळपास दोनशे एकरात पावसाच्या पाण्याचे तळे साचले असून पन्नास एकर क्षेत्रावरील मातीही वाहून गेली आहे. मंगळवारी रिमझिम पावसाने सुरुवात झाली तर, बुधवारपर्यंत या पावसाचा जोर वाढू लागला आणि बंधारे फुटून उभ्या पिकामध्ये पाणी शिरले. यामुळे, सोयाबीन, कडब्याचा बनिम, उभा असलेला ऊस मुळासगट वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
तालुकानिहाय पावसाची नोंद
उमरगा - 902 मिलिमीटर
लोहारा - 801 मिलिमीटर
कळंब - 751 मिलिमीटर
उस्मानाबाद - 745 मिलिमीटर
तुळजापूर- 705 मिलिमीटर
वाशी - 703 मिलिमीटर
भूम- 666 मिलिमीटर
परंडा - 593 मिलिमीटर
हेही वाचा - उस्मानाबाद - मुसळधार पावसाने पिकांचे नुकसान, बळीराजा संकटात