ETV Bharat / state

उस्मानाबाद : एकाच दिवसात नव्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, जिल्ह्याचा आकडा पोहोचला ४३ वर

लॉकडाऊनच्या सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा बघता बघता रेड झोनमध्ये गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर 11 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Osmanabad district  new corona positive found
उस्मानाबाद : एकाच दिवसात नव्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद
author img

By

Published : May 27, 2020, 11:47 AM IST

उस्मानाबाद - लॉकडाऊनच्या सुरुवातीला ग्रीन झोनमध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा बघता बघता रेड झोनमध्ये गेला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 43 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून मंगळवारी एकाच दिवशी आठ कोरोनाबाधित रुग्ण आढळले.

कोरोना संक्रमित 43 रुग्णांपैकी 34 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. मंगळवारी दिवसभरात परंडा तालुक्यातील क्‍कुकडगाव येथे 3 रुग्ण सापडले तर कळंब तालुक्यात एक, उमरगा तालुक्यातील बेडगा येथे एक, उस्मानाबाद तालुका येथे एक तसेच शहरात एक असे दिवसभरात एकूण 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून मिळाली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात 43 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी जिल्ह्यातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी 61 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. तर 11 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.