उस्मानाबाद- भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानीच्या मुख्य मंदिरापासून काही अंतरावर देवीची मूर्ती उभी राहणार आहे. 125 फूट देवीची मूर्ती उभारण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानाने घेतला आहे. मात्र, या निर्णयाला आता पुजारी मंडळीकडून विरोध दर्शवण्यात येत आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले आहे.
देवीच्या दर्शनासाठी भाविक आंधप्रदेश, कर्नाटक, यासारख्या राज्यातून दर्शनासाठी तुळजापूर मध्ये दाखल होत असतात. तुळजाभवानीचे मुळ मंदिर दोन डोंगराच्या दरीत असल्याने गर्दी वाढली की भाविकांना देवीचे दर्शन होत नाही. त्यामुळे भाविकांना परत जावे लागते. आता यातून मार्ग काढण्यासाठी 125 फूटाची मूर्ती तयार करण्यात येणार आहे. जिथून बालाघाट डोंगर रांगाची सुरवात होते त्या ठिकाणी घाटशीळ मंदिराजवळ ही मूर्ती बसवण्यात येणार आहे. मात्र तुळजापूरात मूर्ती उभारण्यापेक्षा सुसज्ज हॉस्पिटल उभे करण्यात यावे अशी मागणी पुजारी मंडळाचे अध्यक्ष किशोर गंगणे यांनी केली आहे.