ETV Bharat / state

मंदिरे खुली करण्यासाठी भाजपसोबत स्थानिक मुस्लिम महिलांचा पुढाकार - Osmanabad agitation news

मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपकडून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात मुस्लिम महिलांनीही पुढाकार घेतला आहे.

आंदोलक महिला
आंदोलक महिला
author img

By

Published : Oct 13, 2020, 4:08 PM IST

Updated : Oct 13, 2020, 5:32 PM IST

उस्मानाबाद - मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी भाजपसोबत आता तुळजापूर शहरातील मुस्लिम महिलांनी देखील पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर उघडण्यासाठी आज (दि. 13 ऑक्टोबर) भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलक

मंदिर बंद उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार, अशी घोषणाबाजी करत महिलांनी तुळजापूर परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात भाजपच्या पदाधिकारी महिलांबरोबराच स्थानिक व्यापारी, मंदिरातील पुजारी आणि गृहणी महिलांनी सहभाग घेतला मंदिर बंद असल्याने मंदिरावर अवलंबून असलेले स्थानिक लोकांचे लहान-मोठे उद्योग, व्यवसाय ठप्प आहेत. यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माचे व्यवसाय येथे चालतात. त्याचबरोबर शारदीय नवरात्रोत्सवमध्ये शहराची आर्थिक उलाढाल चालते. मात्र, मंदिरे बंद असल्याने यांचे व्यवसाय बंद पडले आहेत. हे आंदोलन महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. आंदोलनात सरकारचा निषेध करत सरकारने मंदिरे उघडली नाहीत तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपच्या पदाधिकारी यांनी दिला आहे.

हेही वाचा - उस्मानाबाद : उमेदचे खासगीकरण थांबविण्यासाठी महिलांचे भर पावसात आंदोलन

Last Updated : Oct 13, 2020, 5:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.