ETV Bharat / state

तुळजाभवानीची मुरली अलंकार पूजा - शारदीय नवरात्र महोत्सव तुळजापूर

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. मुरली अलंकार महापूजेत देवीला सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते.

मुरली अलंकार रूपातील तुळजाभवानी
author img

By

Published : Oct 3, 2019, 10:07 PM IST

उस्मानाबाद - शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. यामध्ये देवीच्या हातात श्रीकृष्णाची मुरली दिली आहे.

नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या दिवशी तुळजाभवानी देवीची मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली

ही मुरली श्रीकृष्णाने तुळजाभवानीला दिली असल्याची अख्यायिका सांगितली जाते. मुरली अलंकार महापूजेत देवीला सोन्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. तुळजाभवानी देवीचे हे सजलेले रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली.

हेही वाचा - तुळजाभवानी मंदिरात खासगी सुरक्षा रक्षकांची भाविकांना धक्काबुक्की

चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपात देवीची पूजा मांडण्यात येते. पाचव्या माळेनंतर तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत जाते.

Intro:तुळजाभवानी ची मुरली अलंकार पूजा

शारदीय नवरात्र महोत्सवात आज गुरुवारी पाचव्या दिवशी श्री तुळजाभवानी देवीची नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. यामध्ये देवीच्या हातात श्री कृष्णाची मुरली दिली, ही मुरली श्रीकृष्णाने तुळजाभवानीला दिली असल्याची अख्यायिका सांगितली जाते त्याचबरोबर देवीला भव्य अश्या सोन्याच्या दागिने देवीला सजवलं जातं आणि तुळजाभवानी च्या समोर सिंहांच्या दोन उभ्या चांदीच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत श्री तुळजाभवानी देवीचे हे सजलेलं रुप पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली. चौथ्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे. पाचव्या माळे नंतर तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत जाते त्यामुळे आज भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शन रांग ही पूर्णपणे भरुन गेली होती.Body:यात vis व byte आहेतConclusion:कैलास चौधरी
ई.टीव्ही भारत उस्मानाबाद
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.