तुळजापूर ( उस्मानाबाद ) - आमदारांना घर देण्यासंदर्भातला कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ( Ashok Chavan on MLA houses scheme ) तुळजापुरात दिली आहे. अशोक चव्हाण तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी तुळजापूर येथे ( Ashok chavan Tuljapur Temple visit ) आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अशी माहिती दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती घोषणा
अर्थसंकल्प अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि उपनगरमधील आमदार सोडून 300 आमदारांना घरे देण्यासंदर्भात घोषणा केली होती. मुंबई व्यतिरिक्त इतर जिल्ह्यातून येणाऱ्या आमदारांना मुंबई वास्तव्याला घरे असावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान यानिर्णयानंतर राज्यभर राज्य सरकारवर टीका होऊ लागली. सामान्य माणूस उघड्यावर आणि आमदारांना मात्र मोफत घरे, यावरून टीकेची राळ उठली होती.
हेही वाचा-मोफत नाही, पैसे घेणार : जितेंद्र आव्हाड
आमदारांना मोफत घरे देण्यावरून ( free houses for MLAs ) सर्वत्र टीका सुरू झाली. अशात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ( Jitendra Awhad on Houses for MLA ) आमदारांना मोफत घरे देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याकडून जागेचे आणि बांधकामाचे पैसे घेतले जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र, अशात अशोक चव्हाणांनी निर्णय झाले नसल्याच्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत एकमत आहे की नाही, असा प्रश्न यादरम्यान उपस्थित होत आहे.
हेही वाचा-Chandrakant Patil on MLA House : आमदारांना फुकट घर देण्याची आवश्यकता काय?