ETV Bharat / state

'भारत माता की जय' च्या घोषणा देत वामन पवार यांना अखेरचा निरोप - जवान वामन पवार अखेरचा निरोप

परंडा तालुक्यातील टाकळी येथील सुपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान वामन मोहन पवार (वय-36) यांना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग नरसू या ठिकाणी वीरमरण आले. त्यांचे पार्थिव आज टाकळी या मूळगावी आणण्यात आले.

osmanabad public funeral
'भारत माता की जय'च्या घोषणा देत वामन पवार यांना अखेरचा निरोप
author img

By

Published : Oct 1, 2020, 2:49 PM IST

उस्मानाबाद - परंडा तालुक्यातील टाकळी येथील सुपुत्र भारतीय सैन्य दलातील जवान वामन मोहन पवार (वय-36) यांना जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय राज्यमार्ग नरसू या ठिकाणी वीरमरण आले आहे.

'भारत माता की जय' च्या घोषणा देत वामन पवार यांना अखेरचा निरोप

आज सकाळी त्यांचे पार्थिव मूळ गावी म्हणजेच टाकळी या ठिकाणी आणण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. वामन पवार हे सध्या सैन्यात चालक या पदावर कार्यरत होते.

2003 साली त्यांनी सैन्यदलामध्ये प्रवेश केला. सध्या त्यांनी एक वर्षाची मुदत वाढवून घेतली होती. मात्र मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी कर्तव्य बजावत असताना वामन पवार यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी ,चार वर्षाची मुलगी ,दोन वर्षाचा मुलगा आसा परिवार आहे.

अहमदनगर येथील तुकडीने त्यांना शेवटची सलामी दिली. शहीद जवान वामन पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी परंडा तालुक्यातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.