ETV Bharat / state

जन्मदात्या पित्याने केला विवाहित मुलीचा खून, अनैतिक संबंध असल्याचा राग - tuljapur news

मुलीचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून जन्मदात्या बापानेच विवाहित मुलीचा खून केल्याची घटना घडली.

murder news
murder news
author img

By

Published : Apr 24, 2020, 12:00 PM IST

उस्मानाबाद - तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे जन्मदात्या पित्याने आपल्या मुलीचा खून केला आहे. मुलीचे अनैतिक संबंध असल्याचा राग मनात धरून जन्मदात्या बापानेच विवाहित मुलीचा खून केल्याची घटना घडली.

नंदगाव येथील जगन्नाथ गुड्डे (वय ६५ वर्ष) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. जगन्नाथ यांची विवाहित मुलगी नागाबाई चंदकांत सडके (वय ३८ वर्ष) ही गेली आठ वर्ष वडिलांकडे नवऱ्यापासून विभक्त होऊन राहत होती. नागाबईच्या वडिलास म्हणजे जगन्नाथ यांना आपली मुलगी नीट वागत नाही, तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यासाठी नागाबाईला वेळोवेळी समजावून सांगण्यात आले होते. मात्र, तिच्यात काही बदल होत नसल्याचा राग मनात धरून स्वःताच्या शेतात जगन्नाथ गुड्डे यांनी नागाबाईच्या डोक्यात लाकडाने जबर मारहाण केली. यात ती जागीच ठार झाली.

मुलीचा मृ्त्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांना स्वःता सांगितली. त्यानंतर नळदूर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी जगन्नाथ यांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.