ETV Bharat / state

औशाचे 'गांधी' देणार मोदींना आव्हान, राष्ट्रपती पदासाठीही आजमावले होते नशीब

मनोहर पाटील हुबेहुब महात्मा गांधींसारखा पेहराव करतात. धोतर, पंचा, कमरेला घड्याळ, डोळ्यावर चष्मा असा पेहराव करुन पाटील प्रत्येक ठिकाणी हजर राहतात. आतापर्यंत आण्णा हजारेंची आंदोलने, इतर सामाजिक आंदोलनात त्यांनी अशाच पेहरावात हजेरी लावली आहे. १९९९ पासून ते प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एकवेळ राष्ट्रपतीपदाची निवडणूकही ते लढले आहेत.

author img

By

Published : Mar 30, 2019, 3:13 PM IST

मनोहर पाटील

उस्मानाबाद - गांधींच्या पेहरावात प्रचार करण्यासाठी ओळखले जाणारे मनोहर पाटील हे वाराणसीमधून निवडणूक लढणार आहेत. याआधी त्यांनी उस्मानाबादमधून अर्ज दाखल केला होता. पण, छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद झाला होता. त्यामुळे त्यांनी आता वारणसीतून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मनोहर पाटील १९९९ पासून वेगवेगळ्या निवडणुका लढवत आहेत. त्यांना एकदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक देखील लढवली आहे.

मनोहर पाटील वाराणसीमधून निवडणूक लढणार आहेत

मनोहर आनंद पाटील हे औसा तालुक्यातील मंगरुळ गावाचे रहिवासी आहेत. भारतीय सीमेवरती आर्मड फोर्सेसमध्ये रायफल विभागात ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर ते गावात परतले. १९९३ च्या भूकंपात त्यांनी सर्व कुटूंब गमावले. या भूकंपात त्यांचे आई, वडील, भाऊ, बायको, मुले या सर्वांचा मृत्यू झाला. तेव्हापासून पाटील एकाकी जीवन जगतात. पेन्शचे पैसे ते झाडे लावण्यासाठी आणि प्रदुषणमुक्तीचा संदेश देण्यासाठी खर्च करतात असे ते सांगतात.

मनोहर पाटील हुबेहुब महात्मा गांधींसारखा पेहराव करतात. धोतर, पंचा, कमरेला घड्याळ, डोळ्यावर चष्मा असा पेहराव करुन पाटील प्रत्येक ठिकाणी हजर राहतात. आतापर्यंत आण्णा हजारेंची आंदोलने, इतर सामाजिक आंदोलनात त्यांनी अशाच पेहरावात हजेरी लावली आहे. १९९९ पासून ते प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवत आहेत. एकवेळ राष्ट्रपतीपदाची निवडणूकही ते लढले आहेत.

गांधींच्या पेहरावात पाटील आठवडी बाजार, बस स्थानकावर जाऊन प्रचार करतात. त्यांच्या या पेहरावाने ते लोकांचे लक्ष वेधून घेतात. आतापर्यंत लढवलेल्या एकाही निवडणुकीत माझे डिपॉझीट जप्त झाले नाही, असे पाटील सांगतात. या निवडणुकीतही त्यांनी अर्ज भरला होता. पण, छाननीमध्ये त्यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे आता ते थेट मोदींच्या विरोधात वाराणसीमधून लढवण्याची तयारी करत आहेत.

कैलास चौधरी
ई.टिव्ही भारत उस्मानाबाद

याचे feed मोजो वरती पाठवले आहे आणि ते या नावाने आहे
30_mar_mh_25_osmanabad_gandhi_v/s_modi

औसाचे गांधी लढणार नरेंद्र मोदींच्या विरोधात

भारतीय सीमेवरती आर्मड फॉर्सेस राष्ट्रीय रायफल या विभागात काम करून निवृत्त झालेले मनोहर आनंदराव पाटील हे गेले 1999 पासून ते 2019 पर्यंतची लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवत आहेत मनोहर आनंदराव पाटील यांचा या दिवसातील पेहरावा मात्र  महात्मा गांधीजींच्या प्रमाणेच असतो धोतर, पंचा, गळ्यात जानव, कमरेला अडकवलेला घड्याळ, हातात काठी त्यासोबतच झेंडा, डोळ्यावरती एक गांधीजी चष्मा प्रमाणेच चष्मा आणि सोबतच गांधीजींचा एक फोटो देखील असा पेहरावा घेऊन मनोहर पाटील स्वतःचाच प्रचार करतात प्रचार करतेवेळी आपल्यासोबत तिरंगी झेंडा असतो या तिरंगी झेंड्याचे पावित्र्य राखावे म्हणून पाटील अनवाणी पायानेच आपल्याच प्रचाराची धुरा आपल्याच खांद्यावर ती घेऊन प्रचाराला लागतात बसस्टॅन्ड,आठवडी बाजार अशा गर्दीच्या ठिकाणी  जाऊन प्रचार करतात मनोहर पाटील लातूर जिल्ह्यातील औसा येथील  मंगरूळ या भूकंपग्रस्त गावचे रहिवासी आहेत पाटील यांचे या जगात जवळचे असे कोणीच नातेवाईक नाहीत 1993 सालच्या भूकंपात आई-वडील, भाऊ, बायको, मुलं या सर्वांचा मृत्यू झाला त्यावेळी पासून अण्णा हजारे यांचे आंदोलन असो किंवा सामाजिक कार्यकर्त्यांचा मोर्चा मनोहर पाटील अश्याच गांधीजींच्या पेहराव मध्ये  नक्कीच हजर असतात मी समाजासाठी झोकून देऊन समाजासाठीच काम करणार आहे असे मनोहर पाटील सांगतात माजी सैनिक म्हणून  आलेली पेन्शन ही झाडे लावण्यासाठी आणि प्रदूषणमुक्त चा संदेश देण्यासाठी वापरतात असं त्यांचं म्हणणं 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी उस्‍मानाबाद लोकसभेसाठी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आजपर्यंतचे लढवलेल्या लोकसभा निवडणुकीत मनोहर पाटील यांचं एकदाही डिपॉझिट जप्त झालेले नाही असे पाटील सांगतात मनोहर पाटील यांनी माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधातही लोकसभा निवडणूक लढविली आहे त्याचबरोबर राष्ट्रपतीपदासाठी ही त्यांनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला 2019 च्या लोकसभेत मात्र उस्मानाबाद उमेदवारी अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने आता त्यांची टक्कर थेट नरेंद्र मोदींशी होणार आहेत पाटील यांचा उस्मानाबाद लोकसभा अर्ज बाद झाल्याने आता ते वाराणसी येथे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत पाटील यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.