ETV Bharat / state

उस्मानाबादेत इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे आली मोठी आपत्ती - उस्मानाबाद पाऊस शेती नुकसान

उमरगा आणि लोहारा तालुक्यात कधी नव्हे तो खूप पाऊस पडला. दोन दिवसाच्या परतीच्या पावसाने शेतातील हातातोंडाशी आलेली पिके आणि त्याचबरोबर शेतातील मातीही वाहून गेली आहे.

उस्मानाबाद
उस्मानाबाद
author img

By

Published : Oct 16, 2020, 10:20 PM IST

उस्मानाबाद - मराठवाडा आणि विशेष करून उस्मानाबाद जिल्हा म्हटले की, पाणीटंचाई, टँकर, दुष्काळ, नापिकी आणि दुबार पेरणी हेच नेहमी ऐकायला मिळते. यांचीच नेहमी-नेहमी येणाऱ्या आपत्ती म्हणून ओळख आहे. मात्र, उमरगा आणि लोहारा तालुक्यात कधी नव्हे तो खूप पाऊस पडला. दोन दिवसाच्या परतीच्या पावसाने शेतातील हातातोंडाशी आलेली पिके आणि त्याचबरोबर शेतातील मातीही वाहून गेली आहे.

उस्मानाबादेत इतिहासात पहिल्यांदाच पावसामुळे आली मोठी आपत्ती

सोयाबीनच्या गंजी, ऊस तसेच इतर पिके अगदी खरडून जमीनदोस्त झाली. सोयाबीनची गंजी वाहून जातानाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला. सोयाबीनची गंजी लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील दिलीप देशमुख यांचीही वाहून गेली आहे. देशमुख यांची दहा एकर सोयाबीनची शेती होती, त्यांनी लाखो रुपये खर्च करून सोयाबीन फडतून काढले होते. याची रास करण्यासाठी म्हणून याची बलिम रचून ठेवली. मात्र, या दोन दिवसांच्या पावसामुळे सोयाबीनची गंजी पूर्णपणे पाण्यात वाहून गेली. त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे.

हेही वाचा - शुभसंकेत मानायचे का? नवजात बाळानं डॉक्टरांच्या तोंडावरचा मास्क ओढला

सास्तूर शिवारामध्ये जवळपास 500 एकर पेक्षा अधिक शेतजमिनीवरील पिकांची नासाडी झाली आहे. देशमुख सांगतात की, त्यांच्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढा मोठा पाऊस कधी पाहिला नाही. या पावसामुळे केलेले कष्ट वाया गेले तेही भरून निघेल मात्र आता कष्ट करायचे कुठे? असा प्रश्न पडतो, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.